‘पद्मावती’ विरोधात करणी सेनेची भारत बंदची धमकी
देशभरात ‘पद्मावती’ सिनेमाला होत असलेला विरोधात थांबायचं नाव घेत नाहीये. संजय लीला भन्साळी आणि दीपिकाला धमकी दिल्यानंतर आता पुन्हा एक धमकी देण्यात आलीये.
मुंबई : देशभरात ‘पद्मावती’ सिनेमाला होत असलेला विरोधात थांबायचं नाव घेत नाहीये. संजय लीला भन्साळी आणि दीपिकाला धमकी दिल्यानंतर आता पुन्हा एक धमकी देण्यात आलीये.
श्री राजपूत करणी सेनेने एक डिसेंबरला भारत बंद करण्याची धमकी दिली आहे. याआधी दीपिका पादुकोनचं नाक कापण्याची धमकी त्यांनी दिली होती.
न्यूज एजन्सी आयएएनएसच्या ताज्या अपडेटनुसार, ‘पद्मावती’ रिलीज होत असलेल्या दिवशीच करणी सेनेने भारत बंदचा इशारा दिला आहे. करणी सेनेचे सदस्य महिपाल सिंह मकरानाने एक व्हिडिओ जारी करून सांगितलं की, राजपूत कधीही महिलांवर हात उगारत नाही. पण गरज पडली तर आम्ही दीपिकासोबत ते करु. लक्ष्मणने शूर्पनखासोबत जे केलं होतं ते आम्ही तिच्यासोबत करू. करणी सेनेचे प्रमुख लोकेंद्र सिंह कलवी म्हणाले की, पद्मावतीला विरोध करण्यासाठी एक डिसेंबरला भारत बंद केला जाईल.
दरम्यान, केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी ट्विट करून म्हटले की, सिनेमाची कथा लिहितना लोकांच्या भावनांचा विचार करायला हवा होता. जर आपण पद्मावतीच्या सन्मामाचं बोलतो तर महिलेचा सन्मान झाला पाहिजे. सिनेमातील कलाकारांचा अपमान चुकीचा आहे.
इकडे मुंबईमध्ये बॉलिवूडमधून ‘पद्मावती’ला समर्थन मिळत आहे. सिनेमा आणि टिव्ही दिग्दर्शकांची संस्थेचे अध्यक्ष अशोक पंडित म्हणाले की, सिनेमा कलाकारांना धमकावलं जात आहे. शिव्या दिल्या जात आहेत. आता सांगितले जात आहे की, कसे सिनेमे तयार केले गेले पाहिजे. हा सांस्कृतिक आतंकवाद आहे.