मुंबई : संजय लीला भंसाळी दिग्दर्शित 'पद्मावती' या चित्रपटाचे जसे कौतुक होत आहे तसाच या चित्रपटाला विरोध देखील आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चित्रपटाशी निगडीत वाद पाहता ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर यांनीदेखील याबाबत वक्तव्य केले आहे. शर्मिलाजींच्या मते, 'चित्रपटाशी निगडीत वाद निर्माण करून सिनेमाचे नुकसान अधिक होते. ' पीएचडी चैंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅन्ड इंडस्ट्री ' द्वारा त्यांना लाईफ टाईम अचिव्हमेंट पुरस्कार देण्यात आला.  
 
 चित्रपटासोबत वाद जोडल्यास त्याला किती फायदा होतो ? असा प्रश्न शर्मिलाजींना विचारण्यात आला होता. त्यानंतर शर्मिला म्हणाला, अशा वादांमुळे फार क्वचितच चित्रपटाला फायदा होतो. अनेकदा यामुळे चित्रपटांचे नुकसान होते. 'पद्मावती' सोबत सुरू असलेले वाद त्याला फायदेशीर ठरणार नाही. असे म्हटले आहे. 
 
 पद्मावती चित्रपटाच्या चित्रीकरणापासूनच वाद सुरू होता. करणी सेना आणि राजपूत संघटनांनी या चित्रपटाला विरोध दर्शवला आहे. हा चित्रपट आम्हांला दाखवल्याशिवाय रिलीज केल्यास सिनेमागृहांचे नुकसान होईल. तसेच या गोष्टीला आम्ही जबाबदार राहणार नाही. असा इशाराही देण्यात आला आहे. 


पद्मावती चित्रपटामध्ये दीपिका पादुकोण, शाहीद कपूर आणि रणवीर सिंह मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट १ डिसेंबरला रसिकांंच्या भेटीला येणार आहे.