मुंबई : काही दिवसांपूर्वी निरोप घेतलेली झी मराठी वाहिनीवर 'पाहिले न मी तुला' ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. आशय कुलकर्ण, शशांक केतकर बरोबरच तन्वी मुंडलेची भूमिकादोखील प्रेक्षकांना भावली होती. एकंदरीतच या मालिकेला प्रेक्षकांनी भरपूर प्रेम दिलं होतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता या मालिकेत मनुच्या भुमिकेत दिसलेली अभिनेत्री तन्वी मुंडलेच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर येतेय. अभिनेत्री तन्वी मुंडलेच्या वडिलांच निधन झालं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तन्वीचे वडील प्रकाश मुंडले यांनी २४ ऑक्टोबर रोजी अखेरचा श्वास घेतला. यानंतर तन्वीने वडिलांसोबतचा एक फोटो शेअर करत आपलं दुख; व्यक्त केलयं. ही पोस्ट शेअर करत तन्वीने कॅप्शनमध्ये लिहीलं की, तु माझ्या आयुष्यातील सगळ्यात जवळचा मित्र आहेस आणि हे माझं भाग्य आहे की, मी तुझी मुलगी आहे. खुप प्रेम आबु, See you whenever my time comes...ओम शांती



तन्वीने ही पोस्ट शेअर करताच ही पोस्ट व्हायरल होत आहे. तिच्या चाहत्यांशिवाय मराठी कलाकारदेखील श्रद्धांजली वाहत आहेत. तन्वीने आत्तापर्यंत अनेक नाटकांमध्ये काम केलं आहे. 'पहिले न मी तुला' या मालिकेत मानसीची भूमिका साकारल्यानंतर तिला खरी ओळख मिळाली.