मुंबई : सध्या फक्त आणि फक्त अफगाणिस्तानमधील परिस्थीतीवर संताप व्यक्त करण्यात येत आहे. या गोष्टीचा संताप नागरिकांमधून नाही तर सर्व स्तरातून व्यक्त केला जात आहे. बॉलिवूकर देखील याप्रकरणी आता व्यक्त होताना दिसत आहे. अभिनेता अक्षय कुमारसोबत 'बेल बॉटम' चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणारा अभिनेता कैस खानने देखील अफगाणिस्तानमधील नागरिकांबद्दल चिंता व्यक्त करत तालिबानवर संताप व्यक्त केला आहे. कैस अनेक देशांमध्ये राहिला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फार कमी लोकांना माहिती आहे की कैफला उर्दू, इंग्रेजी, हिंदी आणि फ्रेंच शिवाय इतर 7 भाषा येतात. कैफने  पाकिस्तानवर जोरदार टीका करत अफगाणिस्तानमधील परिस्थितीबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. कैस म्हणाला, 'असंख्य कुटुंब बेघर झाले आहेत. हा फक्त सत्तेचा खेळ असल्याचं स्पष्ट होत आहे. जगला काही गोष्टी कळणं फार महत्त्वाचं आहे.'



कैस पुढे म्हणाला, 'या सगळ्यासाठी पाकिस्तान तालिबानला पैसे पुरवत आहे. कारण ते अफगाणिस्तानवर राज्य करू शकतील.' कैफच्या वडिलांनी त्याला सांगितलं होत की, 'जर तुम्हाला एक भाषा येत असेल तर तुम्ही एक व्यक्ती आहात आणि जर तुम्हाला 10 भाषा येतात तर एका व्यक्तीमध्ये 10 व्यक्ती असतात.'


अफगाणिस्तानवबद्दल सांगायचं झालं तर त्याठिकाणी पुन्हा एकदा तालिबानची सत्ता स्थापन झाली आहे. त्यामुळे तेथील अनेक नागरिक देश सोडण्याचा प्रयत्न करत आहेत. आता तेथील महिला त्यांच्या अधिकारांसाठी चिंतीत आहेत. तर विद्यार्थी आपलं शिक्षण तर थांबरणार नाही ना? असा प्रश्न अफगणास्तानमधील विद्यार्थ्यांना सतावत आहे.