Pakistani Actor Claims On Shah Rukh Khan: बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खान हा जगभरामध्ये त्याच्या अभिनयासाठी ओळखला जातो. विशेष म्हणजे शाहरुखची नक्कल करुन अनेकांनी मोठं होण्याचा प्रयत्न केला. अनेक चित्रपटांमध्ये शाहरुखची नक्कल करण्याचे प्रयत्न झाले. काहींना ते जमलं तर काहींनी पारच त्याची माती केली. मात्र असं असतानाच आता एका पाकिस्तानी अभिनेत्याने चक्क शाहरुख खानवरच आपली कॉपी केल्याचा धक्कादायक आरोप केला आहे. आपल्या एका चित्रपटामधील भूमिकेची कॉपी शाहरुखने केल्याचा दावा पाकिस्तानमधील ज्येष्ठ अभिनेते तौकीर नासीर यांनी केला आहे. तसेच त्याने आपल्याला क्रेडिट देणं गरजेचं होतं. मात्र त्याने ते ही केलं नाही असा आरोप नासीर यांनी केला आहे.


नेमका कोण आहे हा अभिनेता?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नासीर हे पाकिस्तानमधील ज्येष्ठ अभिनेते असून त्यांनी इस्लामाबादमध्ये पाकिस्तान नॅशनल काऊन्सिल ऑफ आर्ट्समध्ये निर्देशक म्हणून काम केलं आहे. नासीर यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. त्यांना प्राइड ऑफ पाकिस्तान, तमाघ-ए-इम्तियाज आणि सर्वोत्तम अभिनेता हे पुरस्कार देण्यात आले आङेत. मात्र त्यांनी शाहरुखने आपल्याला आवश्यक ते श्रेय दिलं नाही असं म्हटलं आहे. 'जबदस्त विथ वासी शाह' या युट्यूब चॅनेलवर दिलेल्या मुलाखतीमध्ये नासीर यांनी हा दावा केला आहे. नासीर यांनी शाहरुख खानने अनेकदा त्यांच्या कामाचं कौतुक केलं आहे. अनेक लोकांच्या माध्यमातून त्याने वेळोवेळी आपल्याला सदिच्छा कळवल्यात असंही नासीर यांनी आवर्जून सांगितलं. "शाहरुख खान हा फार टॅलेंटेड अभिनेता आहे. मात्र हे फार निराशाजनक आहे की त्याने मी दिलेल्या योगदानाचं श्रेय मला कधीच दिलं नाही," असं म्हणत नासीर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 


कोणत्या चित्रपटामध्ये केली नक्कल?


शाहरुखने कोणत्या चित्रपटामध्ये तुमची नक्कल केली किंवा तुम्हाला कॉपी केलं असं विचारलं असता नसीर यांनी चित्रपटाचं नावही सांगितलं. "शाहरुख खानने 'कभी अलविदा ना कहना' या चित्रपटामध्ये साकारलेली भूमिका माझ्या भूमिकेची जशीच्या तशी कॉपी आहे. माझ्या 'परवाज' नाटकातील भूमिकेची त्याने नक्कल केली आहे," असं नासीर म्हणाले.


नक्की वाचा >> 'घाणेरडी पॉ* मानसिकता, तू नरकात मरशील'; अश्लील कमेंट करणाऱ्याला रितेशच्या अभिनेत्रीनं सुनावलं


"त्याच्या पायाला झालेल्या जखेमची त्याने चित्रपटामध्ये जी नक्कल केली आहे त्यामधील बारीक सारीक जागा माझ्या या नाटकामधूनच उचलल्यात," असा दावा नासीर यांनी केला आहे. 



मला श्रेय दिलं नाही


"'कभी अलविदा ना कहना' हा चित्रपट आधी 'परवाझ' नाटकाच्या कथेवरुन घेण्यात आला आहे. या नाटकाची कथा लेखक मस्तानसर हुसैन तरार यांनी लिहिलेली आहे. शाहरुखने त्यांना श्रेय दिलं आहे," असं नसीर मुलाखतीत म्हणाले. नासीर यांनी एक पाऊल पुढे जात निर्माते करण जोहर यांच्यावर टीका केली आहे. करणने मला आणि मस्तानसर हुसैन तरार यांना श्रेय दिलं नाही असं नासीर म्हणाले. 'कभी अलविदा ना कहना' हा चित्रपट 2006 साली प्रदर्शित झालेला.