पाकिस्तानचा हेर असल्याच्या आरोपावर अभिनेत्याचं असं उत्तर
पाकिस्तानी कलाकाराचे नाव हमजा अली अब्बासी असे आहे.
मुंबई : पाकिस्तानमधील एका प्रसिद्ध अभिनेत्याने आपण पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा असलेल्या आयएसआयचा ऐजंट असल्याची कबुली दिली आहे. या पाकिस्तानी कलाकाराचे नाव हमजा अली अब्बासी असे आहे. भारत देशातील एका वृत्तवाहिनीच्या वार्तांकनामध्ये हा अभिनेता आयएसआयचा ऐजंट असल्याचा दावा करण्यात आला होता. त्यानंतर हजमाने त्या वृत्तांकनाचा व्हिडिओ शेअर करत एक वादग्रस्त ट्विट केले आहे.
त्याच्या या ट्विटवर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. मीडिया रिपोर्टनुसार तो पाकिस्तानी पंतप्रधान इमरान खान यांचा निकटवर्तीय असल्याचे समोर येत आहे. भारत देशाच्या स्वातंत्रदिना दिवशी त्याने हे ट्विट केले होते.
'एका भरतीय वृत्तवाहिनीचा असा दावा आहे की, मी पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा असलेल्या आयएसआयचा ऐजंट आहे. हे अगदी बरोबर आहे. फक्त मिच आयएसआयचा ऐजंट नाही तर पाकिस्तानमधील २० कोटी जणता आयएसआयसाठी काम करत आहे ' असे वादग्रस्त वक्तव्य त्याने ट्विटरच्या माध्यमातून केले आहे.
हजमाच्या या ट्विटवर अनेकांनी त्याचे समर्थन केले आहे तर, अनेकांनी मात्र त्याला ट्रोल केले. सोशल मीडियावर अद्यापही हे वातावरण शमलेलं नाही. गत वर्षी मार्चमध्ये झालेल्या पाकिस्तानमधील निवडणूक प्रचारादरम्यान हमजा इम्रान खान यांच्या ‘पाकिस्तान तेहरीक ए इन्साफ’पक्षाच्या प्रचारसभांमध्ये दिसला होता
त्यानंतर तो आयएसआयचा ऐजंट असल्याच्या चर्चा वाऱ्यासारख्या पसरल्या. त्यचप्रमाणे त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काश्मिरच्या मुद्द्यावर ट्विट केले होते. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींना टॅग करत त्यांने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपाच्या विचारसरणीसंदर्भात ट्विट केले.
त्याच्या अशा सततच्या ट्विटमुळे खुद्द पाकिस्तानच्या प्रसारमाध्यमांनी त्याच्या वादग्रस्त ट्विटवर बंदी आणली होती. पाकिस्तानी इलेक्ट्रॉनिक मीडिया नियामक प्रधिकरणाने त्याला एका कार्यक्रमाचे निवेदन करण्यापासून देखील रोखले होते.