Ayesha Omar on Shoaib: पाकिस्तानी मॉडेल-अभिनेत्री आयेशा ओमरने (Ayesha Omar) क्रिकेटर शोएब मलिकसह (Shoaib Malik) असणाऱ्या आपल्या अफेअरच्या चर्चांवर अखेर मौन सोडलं आहे. गतवर्षी सानिया मिर्झा (Sania Mirza) आणि शोएब मलिक घटस्फोट (Shoaib Malik Divorce) घेणार असून आयेशा ओमर त्यासाठी जबाबदार असल्याची चर्चा होती. शोएब मलिक आणि आयेशा ओमर यांच्यातील जवळीक वाढत असल्याने सानिया मिर्झा घटस्फोटाच्या तयारीत असल्याचं बोललं जात होतं. आयेशा आणि शोएबने 2021 मध्ये एक बोल्ड फोटोशूट केलं होतं. या फोटोशूटचे फोटोही त्यावेळी चांगलेच व्हायरल झाले होते. 


आयेशाने फेटाळले दावे


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शोएब अख्तरच्या चॅट शोमध्ये आयेशा ओमरने या सर्व अफवा असल्याचं सांगितलं आहे. आयेशाने सर्व दावे फेटाळताना म्हटलं की "मी कधीही विवाहित पुरुषाकडे आकर्षित होणार नाही. प्रत्येकजण मला ओळखतो आणि हे मला वेगळं सांगण्याची गरज नाही".


जेव्हा शोएब अख्तरने आयेशाला शोएब मलिकसोबच्या अफेअरच्या चर्चा आणि फोटोशूटबद्दल विचारलं तेव्हा तिने सांगितलं की, सर्वात प्रथम भारतीय प्रसारमाध्यांनी ही अफवा पसरवण्यास सुरुवात केली. यानंतर पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी ही बातमी उचलून धरली. यावेळी आयेशाने आपल्याला ओळखणाऱ्यांना या सर्व अफवा तथ्यहीन असल्याचं माहिती असल्याचं म्हटलं.


आयेशा ओमर कोण आहे?


आयेशा ओमर पाकिस्तानच्या मनोरंजन क्षेत्रातील एक प्रसिद्ध चेहरा आहे. सर्वात फॅशनेबल आणि महागड्या अभिनेत्रींमध्ये तिला गणलं जातं. आयेशा एक प्रसिद्ध युट्यूबरही आहे. 


काही महिन्यांपूर्वी दिलेल्या मुलाखतीत, आयेशाने शोएक मलिकसह निकाह करत असल्याचा दावा फेटाळला होता. आपण सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांचा प्रचंड आदर करतो. शोएबशी लग्नाची आपली कोणतीही योजना नाही असं तिने स्पष्ट केलं होतं.


आपण आणि शोएब चांगले मित्र असून अशी नातीही जगात अस्तित्वात असतात असं तिने म्हटलं आहे. शोएब आणि सानिया यांचं 2010 मध्ये लग्न झालं असून त्यांना एक मुलगाही आहे. 2018 मध्ये इझानचा जन्म झाला.