मुंबई : कलाविश्वात अशा अनेक घटना घडतात ज्यामुळे नव्या अभिनेत्रींना मोठ्या संकटांचा सामना करावा लगतो. असाचं एक प्रकार पाकिस्तानमध्ये घडला आहे. चित्रपट आणि रंगमंच अभिनेत्रीवर तिच्या सह-अभिनेत्रींचे न्यूड व्हिडीओ बनवल्याचा आरोप आहे. गुरुवारी लाहोर पोलिसांनी सांगितले की, अभिनेत्रीवर तिच्या सहअभिनेत्रींचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ बनवल्याचा आरोप आहे. यानंतर पाकिस्तानच्या फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीच्या सायबर क्राइम विंगने अभिनेत्रीविरोधात एफआयआर दाखल केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सहकलाकारांचे व्हिडीओ शूट करणाऱ्या अभिनेत्रीचं नाव खुशबू असं आहे. रिपोर्टनुसार, खुशबू व्यतिरिक्त काशिफ खानवर देखील याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. आता दोघांवर काय कारवाई होणार याकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे. 


एका अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, 'चेंजिंग रुममध्ये कॅमेरा लपवता यावा म्हणून खुशबूने थिएटरमधील कर्मचारी काशिफ खान याला एक लाख रुपये दिले. तिला नाटकात काम करणाऱ्या 4 अभिनेत्रींचे न्यूड व्हिडिओ बनवायचे होते.' एवढंच नाही तर खुशबूने त्यांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आक्षेपार्ह व्हिडीओ इंटरनेटवर अपलोड करण्याची धमकी देखील दिली.


याप्रकरणी पोलिसांनी सांगितले की, काशिफ खानला अटक करण्यात आली आहे, तर खुशबूला 21 डिसेंबरपर्यंत अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे. खुशबूचं सहकलाकारांसोबत भांडण झालं होतं. त्यानंतर अभिनेत्रीला नाटकातून बाहेरचा रस्ता दाखवला. हाच राग मनात ठेवून तिने 4 अभिनेत्रींचा न्यूड व्हिडीओ बनवला.