सुंदर दिसण्यासाठी वयाच्या 64 व्या वर्षी अभिनेत्रीला बोटॉक्सचा आधार, हे प्रकरण असतं तरी काय?
वयाच्या 64 व्या वर्षी देखील अभिनेत्री दिसते तरुण, तिच्या सौंदर्याचं रहस्य म्हणजे बोटॉक्स... नक्की काय आहे बोटॉक्स वाचा
मुंबई : अनेक अभिनेत्री सुंदर दिसण्यासाठी अनेक सौंदर्य प्रसाधनं (Cosmetics) चा वापर करतात. पण एक अभिनेत्री अशी आहे जी वयाच्या 64 व्या वर्षी सुंदर दिसण्यासाठी बोटोक्सचा आधार घेते. या अभिनेत्रीचं नाव आहे पाकिस्तानी अभिनेत्री सबा फैजल (Pak Actress Saba Faisal). सबा फैजलने खुद्द या गोष्टीचा खुलासा केला आहे. सबाला पाहिल्यानंतर तिच्या वयाचा अंदाज घेणं देखील कठीण होईल. वयाच्या 64 व्या वर्षी देखील तिची त्वचा प्रचंड तजेलदार दिसते. ब्युटी ट्रीटमेंटवर डोळे झाकून विश्वास ठेवणारी सबा तरुण दिसण्यासाठी बोटॉक्सचा सहारा घेते.
सबा म्हणते, 'मी खोटं का बोलू, मी सुंदर दिसण्यासाठी बोटॉक्सचा आधार घेते आणि यात मला काही वाईट वाटत नाही...' या गोष्टीचा सर्वांसमोर स्वीकार केल्यानंतर लोक तिला ट्रोल नाही तर सबाचं कौतुक करत आहेत.
सबा (Saba Faisal photo) तरुण दिसण्यासाठी ती बोटॉक्सचा सहारा घेत असली तरी, एका विशिष्ट प्रमाणापेक्षा अधिक अभिनेत्री बोटॉक्सचा वापर करत नाही. सबा फैसल ही पाकिस्तानची एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे जिच्या सौंदर्य आणि फिटनेसचे आजही कौतुक होतं.
काय आहे बोटॉक्स ज्यामुळे तरुण दिसण्यासाठी होते मदत?
आपण सुंदर दिसवं अशी प्रत्येकाची इच्छा असते. सुंदर दिसण्यासाठी फक्त स्त्री नाही तर पुरुष देखील सौंदर्य प्रसाधनं (Cosmetics) आणि त्वचेशी (Skin) संबंधित औषधांचा वापर करतात. पण आपण कोणत्या सौंदर्य प्रसाधनांचा वापर करत आहोत.. हा सल्ला एकदा डॉक्टरांकडून घ्यायला हवा.
सुंदर दिसण्यासाठी काही स्त्री आणि पुरुष बोटॉक्स (Botox) आणि फिलर्स (Fillers) या ट्रीटमेंटचा वापर करून त्वचेची निगा राखतात. ही एक प्रकारची अँटिएजिंग ट्रीटमेंट (Anti-Ageing Treatment) आहे. या ट्रीटमेंटमुळं कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. तसेच ही ट्रीटमेंट वेदनारहित मानली जाते. सध्याच्या काळात विशेषतः तरुणींमध्ये ही ट्रीटमेंट चर्चेचा विषय ठरल्याचं अनेक ठिकाणी सांगण्यात आलं आहे.