मुंबई :  गेल्या वर्षी ड्रग्स प्रकरणात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान अडकला होता. काही दिवसांपूर्वी ड्रग्स प्रकरणात आर्यनला क्लिन चिट मिळाली. तेव्हा आर्यन तुफान चर्चेत आला होता. तेव्हा किंग खानच्या अनेक चाहत्यांनी अभिनेत्याचा विरोध केला, तर काहींनी मात्र त्याच समर्थन केलं. ड्रग्स प्रकरणानूत क्लिन चिट मिळाल्यानंतर आर्यन लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करेल अशी चर्चा रंगत होती. पण आता एका वेगळ्या कारणामुळे आर्यन चर्चेत आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रंगणाऱ्या चर्चांना कारण देखील तसंच आहे. पाकिस्तानची प्रसिद्ध अभिनेत्री सजल अली (Sajal Ali) आर्यन खानच्या प्रेमात पडली आहे. सजलने  इंस्टाग्राम स्टोरीजवर पांढऱ्या टी-शर्टमध्ये आर्यनचा जुना फोटो शेअर केला.



थ्रोबॅक फोटो शेअर करत, सजलने आर्यनवर तिचं असलेलं प्रेम व्यक्त करण्यासाठी शाहरुख खान आणि अनुष्काचे हिट गाणं 'हवाईन' सोबत रेड हार्ट इमोजी पोस्ट केलं.  या पोस्टमुळे सजल तुफान चर्चेत आहे.  (Sajal Ali fall in love with Aryan khan)


सजलचं दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्यासोबत खास कनेक्शन  (Sajal connection with shridevi)
सजलने 2017 मध्ये रवी उदयवार यांच्या 'मॉम' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तिने सिनेमात दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी आर्याची भूमिका साकारली होती. तेव्हा रिल लाईफ आई-लेकीच्या जोडीला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं. 


सजलचा घटस्फोट (Sajal Ali divorce)
2020 मध्ये, सजलने बॉयफ्रेंड आणि सह-अभिनेता अहद रझा मीरसोबत अबू धाबीमध्ये गुपचूप लग्न केलं. दोघांनी 'आंगन' आणि 'याकीन' या पाकिस्तानी मालिकांमध्ये एकत्र काम केलं. यादरम्यान दोघेही प्रेमात पडले. मात्र, त्यांचं नातं दोन वर्षेही टिकलं नाही. अखेर 2022 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.