मुंबई : टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारी हीची मुलगी पलक तिवारी (palak tiwari) नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर फोटो अथवा बॉलिवूडमधल्या सेलिब्रिटींच्या मुलांसोबत लिंकअपच्य़ा बातम्यामुळे ती चर्चेत असते. आता पुन्हा एकदा ती चर्चेत आली आहे. तिने सोशल मीडियावर साडीतले फोटो पोस्ट केले आहेत. हे फोटो पाहून चाहते थक्क झाले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पलक तिवारीने (palak tiwari) पिवळ्या साडीतील लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत. या साडीत ती खुपच छान दिसत आहे. तिच्या फोटोवरून नरज हटवता येत नाहीयेत,इतके सुंदर तिने हे फोटोशुट केले आहे. या फोटोशुटची एकचं चर्चा आहे. पलक तिवारी खूपच ग्लॅमरस आहे, स्टाईलच्या बाबतीत ती आई श्वेता तिवारीवर गेली आहे. 


लुकची चर्चा 
पलक तिवारी (palak tiwari) खुल्या केसांसह पिवळ्या साडीत खूपच सुंदर दिसतेय. पलकने साडीसोबत मॅचिंग फुल स्लीव्ह बॅकलेस ब्लाउज कॅरी केला आहे. तिने भारतीय पोशाखाला ग्लॅमरस टच देण्याचा प्रयत्न केलाय. 



 


म्यूझिक अल्बममध्ये झळकली
पलक तिवारी हार्डी संधूसोबत 'बिजली बिजली' या म्युझिक अल्बममधून प्रसिद्धीच्या झोतात आली. लवकरच ती मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. पलक सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. दररोज तिचे फोटो व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत असतात. ती एक लोकप्रिय स्टार किड आहे.


रिलेशनशिपची चर्चा 
पलक तिवारी नुकतीच तिच्या बॉयफ्रेंडमुळे चर्चेत आली होती. सैफ अली खान आणि अमृता सिंग यांचा मुलगा इब्राहिम अली खानसोबत पार्टीत दिसल्यानंतर दोघेही रिलेशनशिपमध्ये असल्याचे बोलले जात होते. मात्र नंतर पलकने दोघे मित्र असल्याचे स्पष्टीकरण दिले होते. 


दरम्यान पलक अभिनेता वेदांग रैनाला डेट करत असल्याचं बोललं जात आहे. वेदांग झोया अख्तरच्या 'द आर्चीज'मधून पदार्पण करत आहे. द आर्चीजचा फर्स्ट लूक टीझर ऑनलाइन आल्यानंतर लोक वेदांगला ओळखू लागले आहेत. वेदांगसोबत आर्चिसमध्ये शाहरुख खानची मुलगी सुहाना खान, श्रीदेवीची मुलगी खुशी कपूर, अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा यांच्याही भूमिका आहेत.