Guess Who: लहाणपणी इतका क्यूट होता `हा` अभिनेता?, आता अभिनयाने जगावर गाजवतोय राज्य
आता अशाच एका सुपरस्टारचे बालपणीचे छायाचित्र समोर आले आहे.
Guess Who: आज साऊथ इंडियन चित्रपटांनी बराच जोर धरला आहे. बॉलीव़ूडमधल्या मोठ्या मोठ्या स्टार्सच्या सिनेमांनाही या इंडस्ट्रीने मागे टाकलं. आमिर खान आणि अक्षय कुमार यांसारख्या बड्या कलाकरांचेही चित्रपट साऊथ इंडस्ट्रीने अक्षरक्षः मागे टाकले. यामुळे साऊथ इंडियन कलाकार जोरात प्रसिद्धीच्या झोतात येऊ लागले.
आता अशाच एका सुपरस्टारचे बालपणीचे छायाचित्र समोर आले आहे. जे पाहून तो हाच अभिनेता आहे का हे ओळखणे कठीण झाले आहे. परंतु फोटोवरून तरी हा अभिनेता प्रभास असण्याची शक्यता आहे. या निरागस दिसणार्या मुलाने आपल्या एका चित्रपटातून बॉक्स ऑफिसवर आग लावली आणि सर्व रेकॉर्ड ब्रेक केले आणि तो आहे बाहूबली.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोमध्ये दिसणारा मुलगा दुसरा कोणी नसून बाहुबली स्टार प्रभास आहे. माहिष्मती राज्याचा महेंद्र बाहुबली अभिनेता प्रभास या जुन्या चित्रात अतिशय गोंडस स्माईल देत आहे. फोटोत प्रभास सिल्क पँट-शर्टमध्ये दिसत आहे आणि त्याच्या मागे फ्लॉवर पॉट वॉल पेंटिंग दिसत आहे. त्याचे असे आणखीनही काही फोटो व्हायरल झाल्याचे बोललं जाते.
सध्या प्रभास त्याच्या आगामी अनेक प्रोजेक्ट्सवर काम करत आहे. यामध्ये हिंदीसह अनेक तेलुगू चित्रपटांचा समावेश आहे. पूजा हेगडेसोबतचा राधे श्यामचा शेवटचा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर सालार, आदिपुरुष, प्रोजेक्ट के, आणि दिग्दर्शक मारुतीसोबतच्या चित्रपटासह अशा मोठ्या सिनेमांचा प्रभास भाग असणार आहे.