मुंबई : गेल्या काही दिवसांपासून 'पानिपत' चित्रपटाच्या चर्चांना उधाण आलं आहे. चित्रपटात अभिनेत्री कृती सेनन मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. चित्रपटातील तिचा फर्स्ट लूक जारी करण्यात आला आहे. चित्रपटात ती पार्वतीबाईंची व्यक्तीरेखा साकारताना दिसणार आहे. तिने स्वत:च्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून चित्रपटातील तिच्या फर्स्ट लूकला दुजोरा दिला आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चित्रपटातील फर्स्ट लूक पोस्ट करत तिने कॅप्शनमध्ये 'एका खऱ्या राणीला कोणत्याही प्रकारच्या मुकुटाची गरज नसते' असं लिहिलं आहे. महत्त्वाचं म्हणजे चित्रपटाचा ट्रेलर उद्या प्रदर्शित करण्यात येणार आहे. त्यामुळे चाहत्यांची चित्रपटाबद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 


चित्रपटाची कथा पानिपतच्या तिसऱ्या युद्धावर आधारित आहे. हे युद्ध १४ जानेवारी १७६१ साली मराठा आणि अफगाणिस्तानच्या सुलतान अहमद शाह अब्दाली यांच्यामध्ये झाले होते. 


कृती शिवाय चित्रपटात अभिनेता अर्जुन कपूर आणि संजय दत्त देखील मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. 'पानिपत' चित्रपट ६ डिसेंबर रोजी रूपेरी पडद्यावर दाखल होणार आहे.