Pankaj Tripathi's Father Death : 'ओह माय गॉड 2' या चित्रपटामुळे चर्चेत असलेल्या अभिनेका पंकज त्रिपाठी यांना पितृशोक झाला आहे. पंकज त्रिपाठी यांचे वडील पंडित बनारस तिवारी यांनी वयाच्या 98 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी बिहारच्या बेलसंड गावात अखेरचा श्वास घेतला आहे. कुटुंबातील एका व्यक्तीनं दिलेल्या माहितीनुसार, पंकज त्रिपाठी यांच्या वडिलांना श्वास घेण्यास त्रास होत होता. सोमवारी म्हणजे आज सकाळी त्यांची अचानक तब्येत खालावली आणि त्यांचे निधन झाले.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंकज त्रिपाठी हे बिहारच्या गोपालगंज या ठिकाणी राहत होते. तर करिअर करण्यासाठी पंकज हे मुंबईत आले होते. तर त्यांचे वडील आणि आई दोघेही त्यांच्या गावी राहत हते. 'मॅशेबल' ला दिलेल्या मुलाखतीत पंकज त्रिपाठीनं एकदा याविषयी बोलताना सांगितले होते की त्यांनी मिळवलेल्या या यशात किंवा करिअरमध्ये त्यांच्या वडिलांना अजिबात रस नाही. त्यांना हे देखील माहित नाही की त्यांचा मुलगा इंडस्ट्रीत काम करतोय. 


पंकज त्रिपाठी यांनी सांगितलं होतं की त्यांचे वडील फक्त एकदा मुंबईला आले होते. त्यांना मुंबईतली मोठी मोठी घरं आणि बिल्डिंग आवडत नाही. तर त्यांच्या वडिलांनी कधीच थिएटरमध्ये जाऊन कोणता चित्रपट पाहिलेला नाही. घरी देखील ते त्यांचा मुलगा पंकज त्रिपाठीचे चित्रपट देखील तेव्हाच पाहायचे जेव्हा कोणी टिव्ही किंवा कॉम्प्युटरवर त्यांना कोणी ते दाखवत असे. काही दिवसांपूर्वीच पंकज त्रिपाठी यांनी त्यांच्या गावच्या घरी आई-वडिलांसाठी एक टिव्ही आणला होता. 


हेही वाचा : लक्ष्मीकांत बेर्डे जिवंत नाही म्हणून...; मुलाला मिळणाऱ्या वाईट वागणुकीवरून प्रिया बेर्डेनं व्यक्त केली खंत


दरम्यान, 2018 मध्ये हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत पंकज त्रिपाठी म्हणाले की त्यांनी अभिनेता व्हावं अशी त्यांच्या वडिलांची इच्छा नव्हती. त्यांच्या वडिलांची इच्छा होती की मोठं होऊन त्यांच्या मुलानं अभ्यास वगैरे करून डॉक्टर व्हावे. पंकज यांनी यावेळी हे देखील सांगितलं की बिहारच्या गोपालगंज परिसरात जिथे राहतात तिथे लोकांना फक्त दोनचं प्रोफेशन माहित आहेत आणि ते म्हणजे एक डॉक्टर आणि दुसरा इंजीनियर. पंकज त्रिपाठी यांनी अभिनय क्षेत्र निवडल्यानंतर त्यांच्या आई-वडिलांनी त्यांना खूप पाठिंबा दिला. पंकज त्रिपाठी यांनी सांगितलं की त्यांच्या वडिलांना फक्त इतकीच चिंता होती की त्यांचा मुलगा आयुष्य व्यवस्थीत जगण्यासाठी पैसे कमवू शकेल की नाही.