Pankaj Tripathi : 'ओएमजी 2' या चित्रपटामुळे सध्या चर्चेत असणारे अभिनेते म्हणजे पंकज त्रिपाठी. पंकज त्रिपाठी हे त्यांच्या दर्जेदार अभिनयासाठी ओळखले जातात. त्यांनी आजवर अनेक गाजलेल्या चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये काम केलं आहे. पंकज त्रिपाठी यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी त्याच्या करिअरच्या सुरुवातीचा काळ आणि त्यांचं महाराष्ट्रावर असलेल्या प्रेमाविषयी सांगितलं आहे. त्यावेळी महाराष्ट्राचं प्रेम नाही तर त्यासोबतच त्यांचे आवडते कोणते मराठमोळे पदार्थ आहेत याविषयी देखील सांगितलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंकज त्रिपाठी यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या काही जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. सुरुवातीला ते त्यांच्या आवडत्या पदार्थाविषयी बोलताना म्हणाले की बाहेरचं मी जास्त काही खात नाही. शुटिंग असेल तर त्यावेळी मी सेटवर खिचडी करून खातो. कारण खिचडी खाल्यानं पोट हलकं राहतं. जर कधी बाहेर जेवणाची वेळ आली तर दाक्षिणात्य पदार्थ म्हणजे इडली, डोसा इत्यादी पदार्थ खातो. ते पदार्थ मला आवडतात. फक्त इतकंच नाही तर मला आवडणाऱ्या पदार्थांमध्ये झुणका भाकर देखील आहे. पण, मुंबईत आता झुणका भाकर मिळत नाही. अनेक दुकांनांवर आता झुणका भाकरी केंद्र लिहिलेलं असतं पण तिथे झुणका भाकर नाही तर वडापाव मिळतो. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


झुणका भाकर खाण्यासाठी पंकज त्रिपाठी गाठतात पुणे. याविषयी सांगताना पंकज त्रिपाठी म्हणाले की 'झुणका भाकर हा माझा आवडता पदार्थ आहे. कधी माझी झुणका भाकर खाण्याची इच्छा झाली तर मी माझा एक मित्र आहे शिवराज चौहान त्यांच्याकडे जातो. ते पुणे-वाई या रस्त्यावर राहतात. मी बऱ्याचदा त्यांच्या घरी स्पेशली झुणका भाकर खाण्यासाठी जातो. त्याच्या घरचं तूप, शेतातली इंद्रायणी तांदळाचा भात आणि झुणका भाकर... व्वा.. अप्रतिम.'


हेही वाचा : सनी देओल, अमीषा पटेल नव्हे तर 'या' प्रसिद्ध कलाकारांना होती 'गदर' चित्रपटाची ऑफर!


पंकज त्रिपाठी यांच्या अभिनयाविषयी बोलायचे झाले तर त्यांना 'मिर्झापूर','सेक्रेड गेम' आणि क्रिमिनल जस्टीस या वेब सीरिजसाठी ओळखले जातात. सध्या ते अभिनेता अक्षय कुमारच्या OMG 2 चित्रपटामुळे चर्चेत आले आहेत. त्यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केले असून त्यांच्या दर्जेदार अभिनयासाठी ते ओळखले जातात. या चित्रपटात त्यांच्याशिवाय अभिनेत्री यामी गौतमी महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती.