Pankaj Tripathi : बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेता पंकज त्रिपाठी आणि त्यांची पत्नी मृदुला नेहमीच एकमेकांसोबत वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये दिसतात. त्यांचं वैवाहिक आयुष्य खूप सुंदर आहे. मात्र, खूप कमी लोकांना माहित असेल की कधीकाळी पंकज स्वत: त्यांची पत्नी मृदुलासाठी स्थळ शोधत होते. पंकज हे मृदुला यांच्या कुटुंबाला त्यांच्यासाठी योग्य तो मुलगा शोधण्यासाठी मदत करत होते. आता त्यांची पत्नी मृदुला यांनीच सांगितलं की एका घटनेमुळे त्यांना या गोष्टीची जाणीव झाली की त्या दोघांमध्ये किती प्रेम आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मृदुला यांनी 'द बेटर इंडिया'ला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांच्या लव्ह स्टोरीविषयी सांगितलं आणि त्याशिवाय अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. मृदुला यांनी सांगितलं की त्या त्यांचं सगळं काही सोडून कधी आणि कशा पंकज यांच्याकडे गेल्या होत्या. एक काळ होता जेव्हा त्या एकमेकांसोबत होते पण तरी सुद्धा पंकज त्यांच्या कुटुंबासोबत मिळून त्यांच्यासाठी मुलगा शोधत होते. मृदुला यांनी पंकज यांना पहिल्यांदा त्यांच्या भावाच्या साखरपुड्यात पाहिलं. त्यानंतर कळलं की ते होणाऱ्या नवरीचे छोटे भाऊ आहेत. त्यानंतर दोघं भेटू लागले आणि त्यांच्यात प्रेम झालं. काही वर्षांनंतर मृदुला यांच्या घरच्यांनी त्यांच्यासाठी लग्नासाठी स्थळ शोधणं सुरु केलं तर पंकज यांना देखील त्यांनी त्या टीममध्ये सहभागी करून घेतलं. ते मृदुला यांच्या भावासोबत आणि त्यांच्या बहिणीसोबत मिळून मुलगा पाहायला जायचे. 



एकदिवस ते आले आणि म्हणाले की हा मुलगा तुझ्यासाठी योग्य आहे. मला चांगल्या प्रकारे भौतिक सुख देऊ शकेल. तेव्हा मला स्पष्ट आणि शुद्ध हिंदी येत नव्हती. तेव्हा मी त्यांना विचारलं की त्याचा अर्थ काय आहे. तेव्हा ते म्हणाले की 'मटेरियल हॅप्पीनेस' म्हणतात. तेव्हा मला या गोष्टींची जाणीव झाली की या सगळ्यात मी काय काय गमावते. 


पुढे मृदुला यांनी सांगितलं की पंकज नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये शिकण्यासाठी दिल्लीत गेले. तेव्हा मी आधी लग्न ठरलेल्या नात्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होती. मला काही टेकनिक माहित होत्या ज्यानं लग्न मोडता येऊ शकत होतं. पण आता एकच अडचण होती आणि ती म्हणजे पंकजला कसं सांगायचं. त्यांना ही माहिती देण्यासाठी मला महिने लागले. पण जेव्हा सांगितलं आणि मग त्यांनी माझे दिल्लीत येण्याची सगळी अरेंजमेंट्स केली. 


दिल्लीत आल्यानंतर मृदुला काही काळ पंकज यांच्यासोबत त्याच बॉइज हॉस्टेलमध्ये राहत होत्या जिथे पंकज स्वत: राहत होते. मृदुला यांनी सांगितलं की, ते मुलं आजही हेच चिडवतात की मी सत्ते पे सत्ता वाली भाभी हूं. जे अचानक तिथे आले आणि त्यांना आता जबरदस्ती कपडे परिधान करण्यास मजबूर केलं. 


हेही वाचा : ‘परदेसिया’ ते ‘पिया तोसे नैना लागे रे’ पर्यंत आयफा 2024 मध्ये रेखा यांचा धमाकेदार परफॉर्मन्स


या दोघांनी 2004 मध्ये लग्न केलं. त्यानंतर मुंबईत ते शिफ्ट झाले. त्यांना एक मुलगी आहे. त्यांच्या मुलीनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं नसलं तरी देखील तिचे लाखो चाहते आहेत.