मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खानच्या कारने पापाराझीच्या पायाला धडक दिली आहे. नुकतीच करीना कपूर मैत्रिण मलायका अरोराला पाहण्यासाठी तिच्या घरी पोहोचली. अशा परिस्थितीत करीनाला पाहण्यासाठी काही पापाराझीही तिथे पोहोचले होते. दरम्यान, हा अपघात करिनाच्या कारमधील पापाराझीसोबत घडला आहे. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गर्दीत अपघात
समोर आलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की, करीना कपूर मलायका अरोराच्या घरातून बाहेर येताच तिचा ड्रायव्हर कार घेवून गेटवर येतो आणि या दरम्यान पापाराझींचा जमावही कारभोवती येतो. अशा स्थितीत एका पापाराझीचा पाय गाडीखाली येतो. करीनाची नजर त्यावर पडताच ती जोरात ओरडते आणि हातवारे करत ड्रायव्हरला गाडी मागे घेण्यास सांगते.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


करीना काळजीत पडली
करिनाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून चाहत्यांना तिची केअरिंग स्टाईल खूप आवडत आहे. व्हिडिओमध्ये करीना या व्यक्तीची अवस्था विचारतानाही दिसत आहे. यादरम्यान करीना कपूर कॅज्युअल लूकमध्ये दिसली.