पॅरालम्पिकमधील सुवर्णपदक विजेता नवदीप सिंगने (Navdeep Singh) नुकतीच 'द ग्रेट इंडियन कपिल' (The Great Indian Kapil Show) शोमध्ये हजेरी लावली. यावेळी 'भूल भुलय्या 3' (Bhool Bhulaiyaa 3) चित्रपटाच्या निमित्ताने चित्रपटातील संपूर्ण कास्टही उपस्थित होती. यादरम्यान नवदीप सिंगने राजपाल यादवशी (Rajpal Yadav) संवाद साधला. यावेळी त्याने केलेल्या एका वक्तव्यावरुन जोरदार हशा पिकला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) तुफान व्हायरल झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवदीप सिंगने कार्यक्रमात हजेरी लावली असता कपिल शर्माने त्याचं कौतुक केलं. नवदीपनेही कपिल शर्माची फिरकी घेत माझी कधी भेट होईल असं वाटलं होतं का? असं विचारलं. यानंतर कार्तिकनेही नवदीपचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाल्याचं सांगितलं. यादरम्यान नवदीप सिंग राजपाल यादवकडे गेला आणि आपलं सुवर्णपदक दाखवलं. राजपाल यादवनेही नवदीपचं कौतुक केलं आणि म्हटलं की, "आम्ही तुझ्यावर चित्रपट बनवू". यावर नवदीपनेही उत्तर देत, "थोडाच फरक आहे सर. जास्त फरक नसता तर आपण एकत्र खेळत असतो". हे उत्तर ऐकल्यानंतर तिथे एकच हशा पिकला. नवदीपची उंची 4 फूट 4 इंच आहे. 



यावर्षी ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये झालेल्या पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेतील पुरुषांच्या भालाफेक F41 प्रकारात भारताच्या नवदीप सिंगने सुवर्णपदक जिंकलं. कधी काळी आपल्या उंचीवरुन टोले ऐकावे लागलेल्या नवदीप सिंगने F41 पुरुषांच्या भालाफेक प्रकारात भारताला पहिले-पॅरालिम्पिक पदक मिळवून दिले.


पॅरिसमध्ये जबरदस्त कामगिरी केल्यानंतर नवदीपसा प्रसिद्धी मिळाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही त्यांची स्तुती केली आहे. एका मुलाखतीत, नवदीपला त्याच्या कामगिरीमागील प्रेरणाबद्दल विचारले असता एक हृदयद्रावक कथा सांगितली. नवदीपने खुलासा केला की, त्याच्या या प्रकृतीमुळे तो आयुष्यात काहीच करू शकणार नाही म्हणून त्याला आत्महत्या करण्यास सांगितलं होतं. नवदीपने त्याच्या वडिलांनाही श्रद्धांजली वाहिली जे प्रत्येक पाऊलावर त्याच्या पाठीशी उभे राहिले आणि त्याला आलेल्या आव्हानांना न जुमानता जीवनात चांगले काम करण्याची प्रेरणा दिली.