मुंबई : खलनायकाची भूमिका असो किंवा कॉमेडियनची भूमिका असो, बॉलीवूड अभिनेते परेश रावल त्यांची प्रत्येक भूमिका चांगल्या प्रकारे बजावतात. हेरा फेरी या चित्रपटातील परेश रावल यांच्या बाबूराव या व्यक्तिरेखेने लोकांना पोट धरुन हसवलं होतं. आज आपण परेश रावल यांच्या रील लाईफबद्दल नाही तर रिअल आयुष्यातील लव्हस्टोरीबद्दल बोलणार आहोत. फार कमी लोकांना माहिती असेल की, परेश रावल यांनी पहिल्याच नजरेत एका मुलीच्या प्रेमात पडले होते.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा किस्सा परेश रावल यांच्या आयुष्यातील आहे जेव्हा अभिनेते तरुण होते. अभिनेत्याने एके दिवशी एका मुलीला पाहिलं आणि पहिल्याच नजरेत ते तिच्या प्रेमात पडले. विशेष म्हणजे ती मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून त्यांच्या बॉसची मुलगी होती जिचं नाव स्वरूप संपत होतं. स्वरूप संपत यांनी १९७९ साली मिस इंडियाचा किताब पटकावला होता.


या अभिनेत्याने स्वरूप संपतला एका ड्रामा शो दरम्यान पाहिलं होतं आणि त्यांना तिथे पाहून परेश यांनी आपल्या मित्राला सांगितलं की ही मुलगी माझी पत्नी असेल. तेव्हा त्यांच्या मित्राने त्यांना सांगितलं की, ती तुझ्या बॉसची मुलगी आहे पण परेश रावल यांनी हे मान्य केलं नाही.



अखेर काही दिवसांनी परेश रावल यांनी स्वरूपला थेट लग्नासाठी प्रपोज केलं. अभिनेत्याचं म्हणणं ऐकून स्वरूपा थोड्या घाबरल्या आणि त्यांना उत्तर देण्यासाठी वेळ मागितला. मात्र, नंतर स्वरूप संपत यांनी त्यांना होकार दिला आणि काही वर्षांनी 1987 मध्ये दोघांनी लग्न केलं. आज परेश रावल आणि स्वरूप संपत यांना दोन मुलं आहेत.