मुंबई : बॉलिवूडमध्ये एक काळ गाजवलेल्या परेश रावल यांनी ६५व्या वर्षात पदार्पण केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना वाढदिवसाचे औचित्य साधत खास भेट दिली आहे, असे परेश रावल यांनी ट्विटरच्या माध्यमातून सांगितले आहे. परेश रावल अहमदाबाद पूर्व लोकसभेचे सदस्य होते, परंतू लोकसभा निवडणूक २०१९ मध्ये ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले नाहीत. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी ही माहिती पक्षास दिली होती. 
 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्या वाढदिवसादिवशी परेश रावल यांनी ट्विटरवर पोस्ट शेअर करत कॅप्शनमध्ये 'माझ्या वाढदिवसादिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. त्यामुळे मी स्वत:ला फार भाग्यवान समजत आहे. माझ्या जन्मदिनादिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधान झाले आहेत. हिच माझ्या आयुष्यातील फार मोठी भेट आहे.' असे त्यांनी लिहिले आहे. 


गुरूवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. आज संध्याकाळी राजभवनात शपथविधी समारंभ पार पडला. या शपथविधी समारंभात देश-विदेशातले अनेक नेतेमंडळी त्याचप्रमाणे बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकार उपस्थित होते.