Pradeep Sarkar Death: यंदाच्या वर्षाच्या सुरुवातीपासूनच अनेक कलाकारांनी जगाचा निरोप घेतला. अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते सतीश कौशिक यांच्या निधनामागोमागच आणखी एक मोठं नाव जगाचा निरोप घेऊन या वर्तुळातून बाहेर पडलं आहे. हिंदी आणि बंगाली चित्रपट जगतात एक संवेदनशील दिग्दर्शक अशी ओळख असणाऱ्या प्रदीप सरकार यांनी वयाच्या 68 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. शुक्रवारी त्यांच्या निधनाचं वृत्त समोर आलं. (parineeta director Pradeep Sarkar Dies at the age of 68 )


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सूत्रांच्या माहितीनुसार गेल्या काही काळापासून ते किडनीच्या आजाराशी झुंज देत होते. गुरुवारी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास त्यांना त्रास होऊ लागला. त्यांच्या शरीरातील पोटॅशियमची मात्र प्रमाणापेक्षा कमी झाली होती. परिस्थिती अधिक बिघडल्याचं लक्षात येताच त्यांना मुंबईतील रुग्णालयात नेण्यात आलं. पण, डॉक्टरांच्या प्रयत्नांनंतरही त्यांचे प्राण वाचवता आले नाहीत. 


हेसुद्धा वाचा : Video : रणवीर - दीपिकामध्ये बिनसलं? वडिलांसमोरच केलेल्या कृतीने पतीचा चेहराच उतरला


 


सरकार यांच्या निधनाचं वृत्त कळताच कलाजगतातून अनेक कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिल्याचं पाहायला मिळालं. अभिनेता अजय देवगन, अभिषेक बच्चन यांनी ट्विट करत सरकार यांना श्रद्धांजली वाहिली. 'या धक्कादायक बातमीनं आज जाग आली. तुमच्या आत्म्यास चिरशांती लाभो दादा... मला तुमच्या आयुष्यातील एक लहानसा घटक बनवून घेतल्याबद्दल आभारी आहे... तुमची आठवण कायमच येत राहील', असं अभिषेकनं ट्विट करत लिहिलं. 



प्रदीप सरकार यांच्या कारकिर्दीविषयी थोडं... 


चौकटीबाहेरचे आणि तितकेच संवेदनशील विषय चित्रपटांच्या माध्यमातून अतिशय कलात्मकपणे मांडणारे सरकार एक अॅड फिल्म मेकरही होते. या क्षेत्रातील योगदानासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं. 2005 मध्ये प्रदर्शित झालेल्या  'परिणीता' या चित्रपटाचं दिग्दर्शन करत त्यांनी बॉलिवूड कारकिर्दीचा श्रीगणेशा केला होता. पुढे त्यांनी  'लागा चुनरी में दाग', 'मर्दानी', 'लफंगे परिंदे' अशा चित्रपटांचंही दिग्दर्शन केलं होतं. काही वेब सीरिजच्या दिग्दर्शनाचं श्रेयही सरकार यांनाच जातं.