Video : रणवीर - दीपिकामध्ये बिनसलं? वडिलांसमोरच केलेल्या कृतीने पतीचा चेहराच उतरला

Deepika Ranveer : काही दिवसांपूर्वीही दीपिका आणि रणवीरमध्ये काही ठीक नाही अशी चर्चा सुरु झाली होती. त्यावेळी दोघांनीही याबाबत स्पष्टीकरण दिलं होतं. मात्र आता पुन्हा एकदा व्हायरल झालेल्या व्हिडीओमधून वेगळीच शंका निर्माण झाली आहे.  

Updated: Mar 24, 2023, 10:35 AM IST
Video : रणवीर - दीपिकामध्ये बिनसलं? वडिलांसमोरच केलेल्या कृतीने पतीचा चेहराच उतरला title=

Deepika Ranveer : ऑस्कर सोहळ्यात (oscar 2023) हजेरी लावल्यानंतर आता बॉलिवुड अभिनेत्री दीपिका पदुकोण इंडियन स्पोर्ट्स ऑनर्स अवॉर्ड सोहळ्यात (Indian Sports Honours) दिसली होती. यावेळी तिच्यासोबत तिचा पती अभिनेता रणवीर सिंग (Deepika Padukone-Ranveer Singh) आणि दीपिकाचे वडील प्रकाश पदुकोण (Prakash Padukone) देखील उपस्थित होते. गुरुवारी पार पडलेल्या या सोहळ्यात  रेड कार्पेटवर अनेक बॉलिवुड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. यावेळी दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांनीही रेड कार्पेटवर स्टायलिश एन्ट्री केली. मात्र दीपिकाच्या एका कृत्याने त्यांच्यात काही ठिक नाही का असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांमध्ये निर्माण झाला आहे.

दीपिकाने वडिलांसोबत लावली हजेरी

गुरुवारी इंडियन स्पोर्ट्स ऑनर 2023 पुरस्कार सोहळ्याचे मुंबईत आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात क्रीडा क्षेत्रापासून बॉलिवूडपर्यंतचे मोठे मोठे सेलिब्रिटी सहभागी झाले होते. या सोहळ्यात दीपिका रणवीर सिंग आणि वडील प्रकाश पदुकोणसोबत या कार्यक्रमात पोहोचली होती. या कार्यक्रमात दीपिका, रणवीर आणि प्रकाश पदुकोण यांच्या खास लुकने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. दीपिकाने यावेळी काळ्या रंगाची साडी घातली होती. तर रणवीर सिंग आणि प्रकाश पदुकोण देखील काळ्या कोट-पँटमध्ये दिसले. दीपिका पदुकोणचे वडील प्रकाश पदुकोण हे उत्कृष्ट बॅडमिंटनपटू आहेत त्यामुळे ते जोडीसह कार्यक्रमात सहभागी झाले होते.

दीपिका - रणवीरमध्ये बिनसलं?

या कार्यक्रमात रणवीरने दीपिकाचा हात पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र दीपिकाने रणवीरकडे दुर्लक्ष केले आणि ती पुढे निघून गेली. या कृतीमुळे दोघांच्याही चाहत्यांच्या मनात आता वेगळीच शंका निर्माण झाली आहे. दोघांच्या नात्यात काही बिनसलं आहे का अशी चर्चा सध्या सुरु झाली आहे. इंस्टाग्रामवर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये रणवीर दीपिका पदुकोणची कारमधून खाली उतरताना वाट पाहत होता. रेड कार्पेटवर एन्ट्री करण्यापूर्वी दोघांनी काही लोकांसोबत संवाद साधला. त्यानंतर पुढे जाण्यासाठी रणवीरने हात पुढे केला. मात्र दीपिकाने त्याकडे दुर्लक्ष केले आणि पुढे निघून गेली. त्यानंतर दोघांनी पुढे जाऊन फोटोग्राफर्सना पोज देण्यास सुरुवात केली. 

पाहा व्हिडीओ -

दीपिकाला मोठी स्टार असल्याचे वाटते...

मात्र दीपिकाच्या या कृतीमुळे सगळे त्यांच्याकडे पाहतच राहिले. व्हिडीओ समोर आल्यानंतर दोघांचेही चाहते चिंतेत आहेत. दोघांची वागण्याची पद्धत बदलली आहे. त्यांच्यात याआधीही भांडण झाले होते. दीपिका रागावली आहे म्हणून तिने हात पकडला नाही, अशा प्रतिक्रिया त्यांचे चाहते देत आहेत. दुसऱ्या एका युजरने "त्यांच्यामध्ये काहीतरी बिघडलं आहे. त्याने तिचा हात धरण्यासाठी पुढाकार घेतला होता मात्र तिने दुर्लक्ष केले. मला वाटते की दीपिका त्याचा अनादर करत आहे. कारण तिला वाटते की ती त्याच्यापेक्षा मोठी स्टार आहे," अशी तिखट प्रतिक्रिया दिली आहे.