Parineeti Chopra House: सध्या सर्वत्र चर्चा आहे ती म्हणजे परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांची. त्यांच्या लग्नाची जोरात चर्चा होती. संपुर्ण नॅशनल मीडियामध्ये फक्त परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचे फोटो हे जोरात व्हायरल होत होते. यावर्षीच्या मार्च महिन्यापासून त्यांची चर्चा सुरू झाली होती. अनेक ठिकाणी ते एकत्र स्पॉट होऊ लागले आणि चाहत्यांमध्ये एकच कुजबूज सुरू झाली. त्यांच्या रिलेशनशिपवर शिक्कामोर्तब झाला आणि मे महिन्यात त्यांचा साखरपुडा पार पडला आणि आता ते लग्नबंधनात अडकले आहेत. उदयपूरसारख्या रॉयल ठिकाणी तिचा आणि 'आप'चे खासदार राघव चड्ढा यांचा विवाहसोहळा पार पडला. 24 सप्टेंबरला ते लग्नबंधनात अडकले. त्यांच्या रॉयल लग्नाची जोरात चर्चा रंगलेली होती. परंतु ट्रोलर्सनी त्यांच्या या लग्नावर टिकाही केली होती. तिनं अनेक मोठ्या सेलिब्रेटींच्या लग्नाची कॉपी केली अशी टीका त्यांच्यावर करण्यात आली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, आता परिणीती आणि राघव चड्ढा यांनी आपल्या नव्या संसाराला सुरूवात केली आहे. रिपोर्ट्सनुसार ते हनिमूनला न गेल्याचं कळतं आहे. अद्याप तरी त्यांच्या हनिमूनची काहीच अपडेट आलेली नाहीये. त्यामुळे तिनं आपल्या नव्या संसारासाठी घराच्या सजावट सुरू केली आहे. परिणीतीनं 40 कोटींचा फ्लॅट घेतला आहे. सोबतच तिनं 22 कोटींचे त्या घरासाठी इंटेरिअर केलं आहे. त्यामुळे आपल्या नव्या संसारासाठी परिणीतीनं जोरात तयारी सुरू केली आहे. चला तर मग या लेखातून जाणून घेऊया तिच्या या नव्या घराविषयी. तिचं घरं हे आतून खूप सुंदर आहे. मध्यंतरीही तिच्या या घराची खूपच चर्चा होती. लग्नाच्या निमित्तानं तिच्या या घराच्या इमारतीबाहेरही सुंदर असं डेकोरेशन आणि लाईटिंग केले होते. 


हेही वाचा : नाना पाटेकर यांनी The Vaccine War साठी किती मानधन घेतलं? म्हणाले...


परिणीती चोप्रा हिचा हा फ्लॅट मुंबईच्या अत्यंत पॉश अशा ठिकाणी आहे. बांद्रा येथे हा फ्लॅट आहे. चक्क गगनचुंबी इमारतीत आहे. या घराची किंमत ही 40 कोटी रूपये आहे. तिच्या शेजारी करिना कपूर, सिद्धार्थ मल्होत्रा, शाहरूख खान, सलमान खान असे सेलिब्रेटी आहेत. या घरात दोन मोठे बेडरूम्स, तीन बाथरूम, एक डायनिंग हॉल आणि लिविंह एरिया आहे आणि मोठी अशी बालकनी आहे. 



तिनं या घराला सुंदर असं डेकोरेट केलं आहे. लंडनवरून तिनं हे इंटेरियर आणलं आहे. तिनं फार आगळ्यावेगळ्या पद्धतीनं हे डेकोरेशन केलं आहे. लिव्हिंग रूममध्ये फार सुंदर असं एन्टिंक पिसेस आहेत. सोबतच तिच्या मोठं असं बुकशेल्फ आहे. तिनं आपलं बेडरूमही सजवलं आहे. रंगाला क्लासिक असे रंग दिले आहेत. घरात फ्रेंच विन्डोज आहेत. बाल्कनीसमोर सुंदर असा व्हू आहे. संपूर्ण घराला पेस्टल परंतु डार्क शेड्सचे रंग दिले आहेत.