‘केसरी’त ही अभिनेत्री असणार अक्षय कुमारची हिरोईन
अक्षय कुमार आणि करन जोहरच्या बहुचर्चीत ‘केसरी’ सिनेमासाठी मुख्य अभिनेत्री फायनल झाली आहे. निर्माता करन जोहरने ट्विट करून ही माहिती दिली.
मुंबई : अक्षय कुमार आणि करन जोहरच्या बहुचर्चीत ‘केसरी’ सिनेमासाठी मुख्य अभिनेत्री फायनल झाली आहे. निर्माता करन जोहरने ट्विट करून ही माहिती दिली.
अक्षयच्या लूकने धमाका
काही दिवसांपूर्वीच ‘केसरी’ या सिनेमाचा फर्स्ट लूक जाहीर करण्यात आला होता. या पोस्टरमधील अक्षयचा लूक पाहून या सिनेमाची चांगलीच उत्सुकता वाढली आहे. त्यासोबतच यात अक्षयची हिरोईन कोण असणार याकडेही सर्वांच्या नजरा होत्या. अखेर या सिनेमाची हिरोईन फायनल झाली आहे.
करन जोहरचे ट्विट
या सिनेमाचा निर्माता करन जोहर याने ट्विट करून या सिनेमाच्या हिरोईनची माहिती दिली. या सिनेमात अक्षयसोबत परिणीती चोप्रा दिसणार आहे. अक्षयने याआधी परिणीताची बहिण प्रियंका चोप्रासोबत अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. पण परिणीतीसोबत अक्षय पहिल्यांदाच काम करतो आहे. त्यामुळे या जोडीची केमिस्ट्री कशी असेल याकडे सर्वांच्या नजरा असतील.
या युद्धावर आधारित सिनेमा
करन जोहर आणि अक्षय कुमार हा सिनेमा एकत्र तयार करत आहेत. सारागढी युद्धावर हा सिनेमा आधारित आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन अनुराग सिंह करणार असून हा सिनेमा २०१९ मध्ये होळी दरम्यान रिलीज होणार आहे.