`मला राजकारण्याशी लग्न...`, AAP खासदाराशी नावं जोडलं जात असतानाच Parineeti Chopra चा `तो` Video Viral
Parineeti Chopra does not to get married to Politician : परिणीति चोप्राचा हा व्हिडीओ 2019 सालचा आहे. तिच्या आणि राघव चड्ढा यांच्या लग्नाच्या चर्चा सुरु झाल्यानंतर तिचा हा व्हिडीओ समोर आला आहे. त्या व्हिडीओवर नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहे. दरम्यान, या सगळ्यात परिणीति आणि राघव हे बऱ्याचवेळा एकत्र दिसले.
Parineeti Chopra does not to get married to Politician : बॉलिवूड अभिनेत्री परिणीति चोप्रा (Parineeti Chopra) ही तिच्या खासगी आयुष्यामुळे काही दिवसांपासून चर्चेत आहे. परिणीति तिच्या रिलेशनशिपच्या चर्चांमुळे चर्चेत आहे. परिणीति ही आम आदमी पार्टीचे चर्चेत राहणारे नेता आणि पंजाबचे राज्यसभा खासदार राघव चढ्ढा (Raghav Chadha) आहे अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहेत. त्यांचे फोटो आणि व्हिडीओ गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अशात परिणीतिचा एक जुना व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. यात परिणीति ती कधीच कोणत्या राजकारणीशी लग्न करणार नाही असं म्हणताना दिसली आहे. तिचा व्हिडीओ व्हायरल होताच त्यावर नेटकरी प्रतिक्रिया देत आहेत.
परिणीतिचा हा व्हिडीओ 2019 साली प्रदर्शित झालेल्या 'जबरिया जोडी' या चित्रपटात दिसली होती. त्याच चित्रपटाच्या प्रमोशनवेळी एका मुलाखतीत परिणीतिनं हे वक्तव्य केलं आहे. व्हायरल व्हिडीओ दरम्यान, परिणीती आणि सिद्धार्थ हे एक रॅपिड फायर राऊंड खेळत होते. तेव्हा परिणीतिला प्रश्न विचारण्यात आला की तिला कोणत्या सेलिब्रिटीशी लग्न करायचं आहे? सगळ्यात आधी परिणीतिनं ब्रॅड पिटचं नाव घेतलं. त्यानंतर पत्रकारानं तिला एका राजकारणीचं नाव विचारलं. त्यावर उत्तर देत म्हणाली, 'बरेच आहेत, पण समस्या ही आहे की मला राजकारणीशी लग्न करायचे नाही.' (Parineeti Chopra on marrying Politician)
पुढे पत्रकारानं तिला कसा साथीदार हवा आहे असा प्रश्न विचारताच परिणीति म्हणाली, माझ्या साथीदारात तीन गोष्टी असणं गरजेचं आहे आणि त्या गोष्टी म्हणजे तो विनोदी स्वभावाचा असला पाहिजे. He Should smell Good आणि त्यानं माझा आदर केला पाहिजे. हा व्हिडीओ शेअर करत त्या पत्रकारानं कॅप्शन दिलं की काही वर्षांपूर्वी परिणीति म्हणाली होती की तिला राजकारणीशी लग्न करायचे नाही.
हेही वाचा : ना घर ना जमीन... परिणीतीसोबत नाव जोडलं जात असताना Raghav Chadha यांची एकूण संपत्ती समोर!
परिणीति आणि राघव यांच्याविषयी बोलायचे झाले तर, रविवारी परिणीति आणि राघव हे दोघं मुंबई विमानतळावर एकत्र दिसले होते. यावेळी परिणीतिनं काळ्या रंगाचं शर्ट परिधान केलं होतं. दरम्यान, परिणीतिचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल होतोय त्या व्हिडीओत परिणीतिला पाराझींनी तिला तिच्या लग्ना विषयी प्रश्न विचारताच परिणीतीनं धन्यावद, बाय आणि शुभ रात्री असं म्हणते. दरम्यान, रविवारी राघव चड्ढा हे जेव्हा परिणीतिसोबत दिसले होते, तेव्हा त्यांनी खाकी रंगाचं शर्ट परिधान केलं होतं.