मुंबई : परिनीती चोप्रा सध्या तिच्या आगामी 'कोड नेम: तिरंगा' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. अभिनेत्री सध्या तिच्या ड्रीम प्रोजेक्टमध्ये काम करताना खूप खूश आहे. इतकंच नाही तर 'कोड नेम : तिरंगा'च्या ट्रेलरला चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. दरम्यान, परिणीती चोप्रा मालदीवमध्ये सुट्टी घालवताना दिसली. जिथे अभिनेत्री रिलॅक्स मोडमध्ये दिसली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Parineeti Chopra शेअर केली पोस्ट
परिणीती चोप्राने तिच्या इन्स्टा अकाउंटवरून दोन पोस्ट शेअर केल्या आहेत. पहिल्या फोटोत परिणीती निऑन रंगाची बिकिनी परिधान केलेली दिसत आहे. या पोस्टला कॅप्शन देत अभिनेत्रीने लिहिलं की, 'बिकिनी शूट'. त्याच वेळी, इतर फोटोंमध्ये, परिणीतीने जिम आउटफिट्स कॅरी केले आहेत. ज्यामध्ये ती अगदी फिट दिसत आहे. दुसऱ्या पोस्टला कॅप्शन देत अभिनेत्रीने लिहिलं आहे की, 'माझी जिम तुमच्या जिमपेक्षा चांगली आहे.. हाहा, माझं स्वत:चं अॅक्शन ट्रेनिंग सुरू आहे.. तिरंगा कोड नावाच्या प्रेमाबद्दल धन्यवाद.. मी आणखी एका अॅक्शन फिल्मसाठी तयार आहे'.



हार्डी संधुसोबत दिसणार लव्ह स्टोरी
परिणीती चोप्राचे चाहते तिच्या दोन्ही पोस्टवर खूप प्रेम करत आहेत आणि लाईक्स देऊन प्रेमाचा वर्षाव करत आहेत. अभिनेत्रीच्या आगामी चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर, या चित्रपटात परिणीती चोप्रा आणि हार्डी संधूची प्रेमकथा पाहायला मिळणार आहे. परिणीती आणि हार्डीसोबत 'कोड नेम: तिरंगा'मध्ये शरद केळकर, दिव्येंदू भट्टाचार्य, शिशिर शर्मा, सब्यसाची चक्रवर्ती यांसारखे दमदार कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.