Inside Videos : जयमालासाठी रॉयल एन्ट्री, Umbrella डान्स आणि Raghav Chadha ला किस करताना दिसली Parineeti Chopra
Parineeti-Raghav Wedding Inside Videos: परिणीती आणि राघवच्या लग्नाचे अनेक फोटो व्हायरल होत आहेत. संगीत, हल्दीपासून लग्नातील या नव्या जोडप्याचे लूक तुम्ही पाहिला. अगदी लग्नाचे पहिले फोटोही बघितले. आता या लग्नाचे इनसाइड व्हिडीओ समोर आले आहेत.
Parineeti-Raghav Wedding Inside Videos : परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांचं लग्न उदयपूरमधील हॉटेल लीला पॅलेसमध्ये पंजाबी रितीरिवाजांनुसार पार पडले. या दोघांचे लग्नसोबतचे सर्व फंक्शन्स अतिशय खाजगीत केले. 24 सप्टेंबरला लग्न झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी 25 सप्टेंबरला त्यांनी सोशल मीडियावर या लग्न सोहळ्याचे काही खास क्षण सोशल मीडियावर शेअर केले. पण हे लग्न कसं झालं, परिणीतीने लग्नमंडपात कशी एन्ट्री केली सगळं पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. तर या लग्न सोहळ्यातील काही इनसाइड व्हिडीओ समोर आले आहेत. (parineeti chopra raghav chadha wedding inside videos parineeti raghav kisses video viral on Internet)
परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांच्या लग्नाचे आणि इतर विधींचे अनेक फोटो व्हायरल तुम्ही पाहिलीत. आता या लग्नात परिणीतीने लग्न मंडपात अगदी लाज आणि स्मित हास्यात तिच्या डोळ्यात या क्षणाचा आनंद दिसत होता.
या लग्नातील अजून एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये राघव चड्ढा आणि परिणीती एका छत्री घेऊन नाचताना दिसत आहेत. हा व्हिडीओ राघव चड्ढाच्या फॅन पेज इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे.
तिसऱ्या व्हिडीओमध्ये राघव चड्ढाच्या वराचा आहे. यात राघव चड्ढा सोबत पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालही ढोलवादनाचा आनंद घेतना दिसत आहेत.
पुढच्या व्हिडीओमध्ये परिणीती स्टेजवर राघव यांच्या शेजारी उभी आहे. तिच्या चेहऱ्यावरील आनंद प्रत्येक क्षणी झळकतोय. तिने राघव यांच्या हात घट्ट धरुन ठेवला होता. राघव यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. या व्हिडीओमध्ये परिणीती राघव यांच्या गालावर किस करताना दिसून आली.
लग्नातील अजून एका व्हिडीओमध्ये परिणीती सासू सासऱ्यांना भेटायला जातो तो क्षण कॅमेऱ्यात कैद केला आहे.
राघव आणि परिणीतीच्या लग्नाचा मंडप हा एका स्विमिंग पूलावर बांधण्यात आला होता. मंडप अतिशय सुंदर अशा पांढऱ्या फुलांनी सजविण्यात आला होता.
नवविवाहित जोडप्याचं दोन ठिकाणी रिसेप्शन होणार असून एक दिल्ली आणि एक मुंबईत असणार आहे.