प्रेरणा कोरगांवकर, झी मीडिया, मुंबई : श्रद्धा कपूर सध्या खूपच व्यस्त झाली आहे. एकाच वेळी अभिनेता प्रभाससोबत साहो आणि वरुण धवनसोबत स्ट्रीट डान्सरचं शुटींग ती करत होती. त्यातच सायना नेहवालच्या जीवनावर आधारित बायोपिकमध्ये सायनाच्या भूमिकेसाठी श्रद्धा कपूरची निवड करण्यात आली होती. पण आता श्रद्धाच्या जागी परिणीती या चित्रपटात सायनाची भूमिका साकारणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री श्रद्धा कपूर सायना नेहवालच्या बायोपिकमध्ये काम करणार असल्याचं निश्चित झालं होतं. सायनाच्या भूमिकेसाठी श्रद्धा बॅडमिंटनचं प्रशिक्षण घेतानाचे काही फोटोदेखील समोर आले होते. विशेष म्हणजे श्रद्धा या भूमिकेसाठी सायना नेहवालकडून खास धडेही घेत होती. पण इतर चित्रपटांमुळे सायनाच्या बायोपिकसाठी श्रद्धाला वेळ देता येत नव्हता.


श्रद्धाचं पॅक शेड्डुल पाहता दिग्दर्शकांनी परिणीतीला या भूमिकासाठी विचारलं. त्यामुळे श्रद्धाच्या जागी परिणीतीची निवड झाली. नुकतेच परिणीतीनं तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर स्टेडिअममधील काही फोटो शेअर केले आहेत. सायनाच्या भूमिकेसाठी परिणीती बॅडमिंटनचा तासनतास सराव करत आहे.


सायनाच्या बायोपिकसाठी वेळ देता येत नसलेल्या श्रद्धाकडे सध्या चित्रपटांच्या ऑफर्सची चांगलीच रांग लागल्याचे दिसून येत आहे.