Parineeti Chopra : अभिनेत्री परिणीती चोप्राने (Parineeti Chopra) बॉलिवूडमध्ये चांगलीच ओळख निर्माण केली. तिने अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका बजावल्या आहेत. हल्ली ती तिच्या आगामी चित्रपटाच्या तयारीत व्यस्त आहे. बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा तिच्या चाहत्यांसाठी बॅक टू बॅक चित्रपट घेऊन येत आहे. (Parineeti Chopras big statement Cinema journey is incomplete nz)


हे ही वाचा - जान्हवी कपूरने धाकट्या बहीनीला दिला 'असा' सल्ला की तुम्ही ऐकून व्हाल हैराण...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 


अलीकडेच तिचा 'कोड नेम: तिरंगा' (Code Name: Tiranga) हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे, जो चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घालत आहे. त्याचा नुकताच 'उंचाई' (Uunchai) हा चित्रपटही रिलीजसाठी सज्ज आहे, ज्यामध्ये अमिताभ बच्चन(Amitabh Bachchan), अनुपम खेर (Anupam Kher), डॅनी आणि बोमन इराणी (Boman Irani) दिसणार आहेत. या चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन यांच्या सोबत दिसणारी अभिनेत्री परिणीती चोप्रा म्हणाली की, त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली नसती तर मेगास्टारसोबत काम करणे हा तिचा प्रवास अपूर्ण राहीला असता. 


 



 


परिणिती म्हणते, अमिताभ बच्चन सोबत काम करायची संधी मिळाली नसती तर माझा सिनेमातील प्रवास अपूर्णच राहिला असता. त्यामुळेच ती त्या चित्रपटाचे आभार देखील मानते कारण त्यांच्याशिवाय हा प्रवास कठीण होता. काही दिवसांपुर्वी अमिताभ बच्चन यांचा 80वा वाढदिवस झाला होता. इतकं यश गाठल्यानंतरही दररोज शुटसाठी सेटवर येणे आश्चर्यकारक होते. जणू तो त्यांच्या कारकिर्दीचा पहिला दिवस होता असं त्यांच काम असायचे. त्यांच्या या कामाच्या पद्धतीने परिणीती खूपच प्रेरित झालेली आहे. त्यांच्याकडे सिनेमासाठी असलेले समर्पण, ड्राइव्ह आणि आवड अतुलनीय आहे आणि हेच त्यांना वेगळे करते. त्यांच्यासोबत काम करणे हे परिणीतीच्या बकेट लिस्टमध्ये (Bucket list) होते.


हे ही वाचा -  बॉलिवूड अभिनेत्याचे 'ते' शब्द आणि नेहाच्या डोळ्यात आले पाणी..., पाहा Video



ती पुढे म्हणते, " 'उंचाईच्या सेटवर मी त्याच्यासोबत घालवलेला वेळ हा माझ्या कारकिर्दीतील सर्वात मौल्यवान क्षणांपैकी एक आहे." उंचाई या चित्रपटात परिणीती अमिताभ बच्चन यांच्यासोबत दिसणार आहे आणि अनुपम खेर, बोमन इराणी, डॅनी डेन्झोंगपा (Danny Denzongpa), सारिका आणि नीना गुप्ता (Neena Gupta) यांसारख्या दिग्गज कलाकार ही महत्त्वाची भूमिका बजावताना चित्रपटात दिसणार आहेत. हा चित्रपट 11 नोव्हेंबरला थिएटरमध्ये रिलीज होत आहे.