Bollywood: बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरने खूप कमी वेळात बॉलिवूडमध्ये स्वत:चे स्थान निर्माण केले. दिवंगत अभिनेत्री श्री देवी यांची मुलगी म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री आता तिच्या अभिनयाने लाखो लोकांच्या मनावर राज्य करत आहे. या अभिनेत्रीने अनेक प्रसिद्ध बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. सध्या ती अनेक चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. (Janhvi Kapoor gives advice to younger sister such that you will be shocked to hear nz)
जान्हवीचा आगामी चित्रपट 'मिली' हा 4 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये चांगलीच व्यस्त आहे. प्रमोशनदरम्यान एका मुलाखतीत जान्हवीला तिची बहीण खुशीला एक सल्ला देण्यास सांगितले होते. जी लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी तयार आहे.
जान्हवीने आपल्या बहिणीला कोणत्याही अभिनेत्याला डेट न करण्याचा सल्ला दिला होता. कारण तिला असं वाटते की तिचा आणि तिच्या बहीणीचा स्वभाव हा भिन्न आहे. जान्हवी म्हणाली की, तुमची किंमत जाणून घ्या, इन्स्टाग्रामवर चेहरा नसलेले लोक काय म्हणू शकतात हे जाणून घ्या, तुमच्याकडे दाखवण्यासाठी खूप काही आहे त्याच्या कायम विचार करा.
तिनं त्या मुलाखतीत हे देखील सांगितले की, टीकेला सामोरे कसे जायायचे हे देखील ती खूशीला शिकवणार आहे. विशेषत: ही लढाई सोशल मीडियावर कशी हाताळली जाते हे तिला मी शिकवेन असं त्या मुलाखतीत तिनं सांगितले.