Code Name Tiranga, कोणत्या सिक्रेट मिशनवर निघालीये परिणीती; अभिनय सोडला?
परिणीतीचा हा अवतार तुम्ही पाहिलाच नसेल! धमाकेदार अॅक्शन, हातात बंदूक आणि Code Name Tiranga
Code Name Tiranga Teaser : परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) ही सगळ्यांचीच लाडकी अभिनेत्री आहे. प्रियांका चोप्राची चुलत बहीण असलेली परिणीती आपल्या अनोख्या डॉशिंग अभिनयासाठी ओळखली जाते. गेल्या काही दिवसांपासून परिणीतीने आपला मोर्चा वेबसिरीजकडे वळवल्याचं पहायला मिळत होतं. मात्र, सध्या व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे परिणीतीने अभिनय सोडला की काय?, असा सवाल उपस्थित होत होता. मात्र, असं काही नाहीये.
परिणीतीचा नवा चित्रपट (Parineeti Chopra New Movie) चाहत्यांच्या भेटीला येत आहे. परिणीती चोप्राच्या आगामी Code Name Tiranga या चित्रपटाचा टिझर नुकताच रिलीज झाला आहे. या टिझरमध्ये परिणीती धमाकेदार अंदाजात दिसून आली. हातात बंदूक, नाकातून रक्त आणि सिक्रेट एजंटचा धमाकेदार तडका असा लूक परिणीतीचा दिसत आहे.
आगामी चित्रपटात परिणीती सिक्रेट अजेंटच्या (Spy Agent) रुपात पहायला मिळत आहे. टीझरच्या सुरूवातीलाच परिणीतीची झलक दिसते. परिणीती यामध्ये रक्ताने माखलेली दिसते. तर दुसऱ्या झलकमध्ये परिणीती हातात बंदूक घेऊन अॅक्शन मोडमध्ये दिसून आली. परिणीतीचा हा अवतार पाहून सर्वजण आवाक् झाल्याचं पहायला मिळतंय.
परिणीतीचा हा चित्रपट येत्या 14 ऑक्टोबरला रिलीज होण्याची शक्यता आहे. त्याआधी सर्वजण परिणीतीच्या Code Name Tiranga चित्रपटाच्या ट्रेलरची वाट पाहत आहेत. परिणीतीच्या अॅक्शनने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
पाहा व्हिडीओ
2021 मध्ये रिलीज झालेल्या साइना चित्रपटात परिणीतीला लिड रोल मिळाला होता. त्यात तिच्या अभिनयाने सर्वांना आकर्षित केलं. त्यानंतर तिला चित्रपट मिळाला नाही. त्यानंतर परिणीती रियलिटी शो मध्ये दिसली होती. हुनरबाज शोमध्ये परिणीतीने जज म्हणून काम केलं होतं. त्यानंतर आता तिच्या नव्या चित्रपटाची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.