मुंबई : 'इश्कजादे' चित्रपटाच्या माध्यमातून प्रसिद्धी झोतात आलेली अभिनेत्री परिणिती चोप्रा सध्या चांगलीच चर्चेत आहे. आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर तिने कलाविश्वात आपले स्थात प्रस्थापीत केले आहे. आपल्या फिल्मी करिअरमध्ये परीने काही हिट सिनेमे दिलेत तर काही फ्लॉप देखील ठरले. पण खचून न जाता तिने आपली कामगिरी आणखी चांगल्या प्रकारे चाहत्यांच्या समोर आणली. चाहत्यांकडून तिला प्रचंड प्रेम देखील मिळाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


चाहत्यांना आपल्या आवडत्या कलाकारा बद्दल जाणून घेण्याची उत्सुकता कायम असते. पण परिणिती नेहमीच आपल्या खासगी आयुष्याविषयी बोलणे नेहमीच टाळते. गेल्या अनेक महिन्यांपासून परिणिती बॉलिवूडमधील एका व्यक्तीला डेट करत असल्याच्या चर्चा वाऱ्यासारख्या पसरत आहेत. बॉलिवूडमधील प्रसिद्ध असिस्टंट डायरेक्टर चरित देसाईला डेट करत असल्याची चर्चा आहे. 


मुंबई मिररला नुकताच दिल्याला एका मुलाखतीमध्ये परिणितीला रिलेशनशिप बद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ती म्हणाली की, 'माझ्या आयुष्यात कोणी आहे, कोणी नाही. हे फक्त आणि फक्त माझ्या कुटुंबाला, मित्रमंडळींना चांगलेच माहित आहे. मी कधीच ही गोष्ट स्वीकारलेली नाही किंवा या गोष्टीला नकार देखील दिलेला नाहीये.'


चरित देसाई हा प्रसिद्ध असिस्टंट डायरेक्टर आहे. करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनच्या अनेक चित्रपटांसाठी त्याने असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केले आहे. हे दोघे अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि हॉलिवूड गायक निक जोनसच्या लग्नात एकत्र झळकले होते.