पद्मावती सिनेमाबाबत संसदीय समितीने मागितला रिपोर्ट
पद्मावती सिनेमावरुन देशभरात चांगलाच वाद रंगला आहे. पद्मावती सिनेमाच्या अडचणी दिवसंदिवस वाढत आहे. २ राज्यांमध्ये तर सिनेमावर बॅन करणार असल्याचं देखील सांगण्यात आलं आहे.
नवी दिल्ली : पद्मावती सिनेमावरुन देशभरात चांगलाच वाद रंगला आहे. पद्मावती सिनेमाच्या अडचणी दिवसंदिवस वाढत आहे. २ राज्यांमध्ये तर सिनेमावर बॅन करणार असल्याचं देखील सांगण्यात आलं आहे.
संसदीय समितीच्या सूचना आणि प्रसारण मंत्रालयाने पद्मावती सिनेमाबाबत एक रिपोर्ट मागितला आहे. 15 दिवसाच्या आत हा रिपोर्ट मागवण्यात आला आहे. पद्मावती सिनेमा रिलीज होण्याआधीच वादात सापडला आहे.
पद्मावतीला हिरवा कंदील मिळतो की नाही याबाबत सिनेमाचे निर्माते वाट बघत आहे. दीपिका पादुकोण, शाहिद कपूर आणि रणवीर सिंह यांच्या भूमिका असणारा हा सिनेमा १ डिसेंबरला रिलीज होणार होता. सिनेमा रिलीज होतो की नाही याबाबत शंका आहे. अनेक संघटनांनी याला विरोध केला आहे.