Parth Bhalerao : केन थेम्बा यांच्या लघुकथेवर आधारित 'हम दोनो और सूट' हे एकपात्री नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या नाटकाच्या निमित्ताने अभिनेता पार्थ भालेराव दिग्दर्शनात पदार्पण करत आहे. निरंजन पेडणेकर यांचे लेखन असणारे हे नाटक रितिका श्रोत्री सादर करणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिग्दर्शनाबद्दल पार्थ भालेराव म्हणतो, 'मला ही कथा प्रचंड भावली. 1970 च्या काळातील ही कथा आहे. ही गोष्ट एका अशा कपलची आहे, ज्यांचे नवीनच लग्न झाले आहे, एकमेकांवर प्रेम आहे. तरी बायको नवऱ्याची फसवणूक करत आहे. आता ती असे का करते, हे नवऱ्याला कळल्यावर त्याची प्रतिक्रिया काय असते, या गोष्टीचा त्यांच्या नात्यावर काय परिणाम होतो, हे नाटकात पाहायला मिळणार आहे. नातेसंबंध आणि फसवणूक यावर भाष्य करणारे हे नाटक असून यात प्रेक्षकांना ब्लॅक कॉमेडी अनुभवायला मिळणार आहे. रितिकाने आपल्या अभिनयाने या व्यक्तिरेखेत रंगत आणली आहे. ही एक क्लासिक कलाकृती आहे. याचा पहिला प्रयोग 13 जानेवारी रोजी पुण्यातील दि बॉक्स येथे 9 वाजता होणार आहे.'



रितिका श्रोत्री म्हणते, 'यापूर्वीही मी एकपात्री प्रयोग केला आहे. एका जागी प्रेक्षकांना 1 तास खिळवून ठेवणे, हे मोठे कौशल्य आहे आणि ही ताकद कथेमध्ये असते. प्रत्येक क्षणी ही कथा अनपेक्षित वळण घेते. त्यामुळे प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहाते. आता पुढे काय होणार याची. ही कथाच अतिशय सुंदर आहे.या नाटकात मी पाच व्यक्तिरेखा साकारल्या आहेत.'


हेही वाचा : 'आम्ही इकोनॉमीनं प्रवास करतो आणि..., अक्षयच्या स्फाटपेक्षा कमी मानधन मिळतं'; अभिनेत्याचा खुलासा


पार्थ भालेराव विषयी बोलायचे झाले तर त्याच्या अभिनयाविषयी सगळ्यांनाच कल्पना आहे. आता तो दिग्दर्शनात पदार्पण करतोय. अशात तो स्टेजवर पडद्याच्या मागून कशी कमाल करणार आहे, हे पाहण्यासाठी त्याचे चाहते उत्सुक आहेत. तर त्यानं फक्त मराठी नाही तर बॉलिवूडमध्ये देखील काम केलं आहे. त्यात बिग बींसोबत तो भूतनात रिटर्न्समध्ये दिसला होता. तर दुसरीकडे लवकरच त्याचा आईच्या गावात मराठी बोल हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात तो थ्री इडियट्स या चित्रपटात चतूरची भूमिका साकारणाऱ्या ओमी वैदसोबत दिसणार आहे.