Welcome 3 मधून उदय शेट्टी आणि मजून भाईला डच्चू? निर्माते शोधतायत नवा पर्याय
Welcome 3 : `वेलकम` या चित्रपटाचा तिसरा भाग येणार असून त्या चित्रपटात आता मजनू भाई आणि उदय शेट्टीची जुगलबंदी आपल्याला पाहायला मिळणार नाही. हा विचार अनेकांना धक्का बसवू शकतो. पण आता ते दोघं दिसणार नसल्याचे म्हटले जात आहे.
Welcome 3 : कॉमेडी चित्रपट म्हटले की अनेकांना 2007 साली प्रदर्शित झालेला 'वेलकम' हा चित्रपट आठवतो. या चित्रपटातील सगळ्याच कलाकारांनी प्रेक्षकांची मने जिंकली. चित्रपटातील डायलॉग देखील आजही प्रेक्षकांच्या मनात छाप सोडून गेल्याचे पाहायला मिळते. चित्रपटातील काही पात्र आहेत ज्यांची नावं आठवली तरी अनेकांच्या चेहऱ्यावर हसू येत. ते कलाकार चित्रपटात नसते तर कसं झालं असतं असा देखील अनेकांना प्रश्न पडतो. त्यातील आरडीएक्स, मजनू भाई ते उदय शेट्टी या भूमिका तर काय म्हणाल. चित्रपटातील उदय शेट्टी ही भूमिका अभिनेता नाना पाटेकर यांनी साकारली होती. तर अनिल कपूर यांनी मजनू भाई ही भूमिका साकारली होती. तर हे कलाकार फक्त 'वेलकम' नाही तर 'वेलकम बॅक' या चित्रपटात देखील दिसले होते. पण आता 'वेलकम 3' प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून ते दोघेही या चित्रपटाचा भाग होणार नाही असं म्हटलं जात आहे.
'पिंकविला' च्या रिपोर्टनुसार, वेलकम फ्रॅन्चायझीच्या तिसऱ्या भागाविषयी बोलायचे झाले तर या दोन्ही कलाकारांच्या जागी दुसरे कलाकार या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. तर या चित्रपटासाठी निर्माते फिरोज नाडियाडवाला हे संजय दत्त आणि अरशद वारसी यांच्याशी सद्या बोलत असल्याचे म्हटले जात आहे. या भागात अरशद वारसी हा अनिल कपूर यांच्या भूमिकेत दिसणार आहे. तर संजय दत्त हा नाना पाटेकर यांच्या भूमिकेत दिसेल. तर अक्षय कुमार हा वेलकम बॅक' या चित्रपटात दिसला नव्हता तर आता 'वेलकम' या चित्रपटाच्या तिसऱ्या भागातून तो पुन्हा कमबॅक करणार आहे.
रिपोर्ट्सनुसार, सुत्रानं दिलेल्या माहितीनुसार, फिरोज नाडियाडवालाच्या बॅनर अंतर्गत या फ्रॅन्चायझीचे दोन चित्रपट बनवण्यात आले होते. आता त्याचा पुढचा चित्रपट देखील त्यांच्याच बॅनर खाली बनवण्यात येणार आहे. निर्मात्यांनी गॅंगस्टरच्या भूमिका म्हणजेच उदय शेट्टी आणि मजनू भाईचे पात्र हे संजय दत्त आणि अरशद वारसीला देण्याचा विचार केल्याचे म्हटले जाते. खरंतर या दोघांना पुन्हा एकदा एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत. कारण त्यांची मुन्ना आणि सर्किट ही जोडी आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे.
हेही वाचा : Prabhas चं फेसबूक अकाऊंट हॅक! पोस्ट शेअर करत अभिनेता म्हणाला...
'वेलकम 3' या चित्रपटाची स्क्रिप्ट पूर्ण झाली आहे आणि त्याच्या शूटिंगला पुढच्यावर्षी सुरुवात होणार आहे. तर अक्षय 'हाउसफुल 5' आणि 'जॉली एलएलबी 3' ची शूटिंग संपवल्यानंतर तो 'वेलकम 3' च्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. दरम्यान, प्रेक्षकांना आता हा प्रश्न पडला आहे की नाना पाटेकर आणि अनिल कपूर या चित्रपटाचा भाग का नाही. त्यामागचे कारण प्रेक्षकांना जाणून घ्यायची इच्छा आहे. तर सुत्रानं दिलेल्या माहितीनुसार, त्या दोघांमध्ये आणि निर्मात्यांमध्ये पैशांना घेऊन वाद सुरु आहेत.