Prabhas : दाक्षिणात्य अभिनेता प्रभास हा त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटच्या मदतीनं चाहत्यांच्या संपर्कात राहतो. पण आता एक मोठी गोष्ट समोर आली आहे. प्रभासचं फेसबूक अकाऊंट हे हॅक झालं आहे. त्यासाठी स्वत: प्रभासनं ऑफिशिअलपोस्ट शेअर करत सांगितले आहे. प्रभासनं सांगितलं की त्याचं फेसबूक अकाऊंट हे हॅक झालं असून कॉम्प्रोमाइज झालं आहे. प्रभासनं हे सांगितल्यानंतर त्यावर
प्रभासनं काल म्हणजेच गुरुवारी 27 जुलै रोजी प्रभासचं फेसबूक अकाऊंट हॅक करण्यात आलं. हॅकरनं त्यावरून दोन व्हिडीओ देखील शेअर केले होते. यात हा व्हिडीओ शेअर करत त्या हॅकरनं लिहिलं की अनलकी लोक आहेत! त्यानंतर प्रभासच्या फेसबूक अकाऊंटवरून आणखी एक व्हिडीओ शेअर करण्यात आला. हा एक फूटबॉल खेळत असलेल्या मुलाचा व्हिडीओ आहे. तर पुढच्या पोस्टमध्ये त्या व्यक्तीनं कॅप्शन दिलं की 'Ball fails around the world।' हॅकरची ही पोस्ट पाहिल्यानंतर नेटकरी कमेंट करत त्याला ट्रोल करू लागले. यावेळी ट्रोल करणाऱ्यांनी एका मागे एक फ्लॉप होणाऱ्या प्रभासच्या चित्रपटांना टार्गेट केलं.
त्याला पाहता प्रभासनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट शेअर करत सांगितलं की सगळ्यांना नमस्कार, माझं फेसबूक पेज हे कॉम्प्रोमाइज झालं आहे. माझी टीम याकडे लक्ष ठेवून आहे आणि लवकरच ठीक करण्याचा प्रयत्न करत आहे. दरम्यान, प्रभासच्या आगामी चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर 'प्रोजेक्ट के' हा चित्रपट आहे. या चित्रपटात प्रभाससोबत अमिताभ बच्चन आणि दीपिका पदुकोण दिसणार आहेत. तर या चित्रपटाचं नाव बदलून 'कल्कि 2898' असे देण्यात आले आहे.
Kalki 2898 AD या चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर हा चित्रपट 12 जानेवारी 2024 मध्ये मकर संक्राती आणि पोंगलच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार होता. मात्र, आता निर्माते प्रदर्शनाच्या तारखेत बदल करण्याच्या विचारात आहेत, अशी माहिती समोर आली आहे. चित्रपटात दमदार VFX पाहायला मिळत आहेत. त्याचं थोडं काम बाकी असून चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारिख पुढे ढकलण्यात येईल अशी चर्चा आहे.
हेही वाचा : अजय देवगणच्या 'त्या' कृत्यामुळे संतापली होती काजोल, अभिनेत्याला मागावी लागली होती माफी
Kalki 2898 AD हा चित्रपट बिग बजेट असून बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकार यात दिसणार आहेत. यापूर्वी प्रभास आदिपुरुष या चित्रपटात दिसला होता. यात त्याने प्रभू श्रीराम यांच्या भूमिकेत दिसला होता. मात्र, चित्रपटातील संवाद आणि व्हिएफएक्समुळं सिनेमा वादात अडकला होता. अनेक ठिकाणांहून होत असलेला विरोध पाहता. तसंच, मोठ्या विरोधानंतर चित्रपटातील संवाद बदलण्यात आले होते.