Pathaan Box Office Collection Day 23: बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan) सध्या त्याच्या पठाण चित्रपटामुळे चर्चेत आहे. 'पठाण' नं (Pathaan Box Office Collection) बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. दरम्यान, आता पठाणच्या 12 दिवसांच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनची माहिती समोर आली आहे. शाहरुखच्या पठाणनं डबल डिजीटमध्ये कमाई करण्याचा एक नवा रेकॉर्ड सेट केला आहे. आता 'पठाण' हा बॉलिवूडचा बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. 'पठाण'च्या आधी या यादीत कोणते चित्रपट समाविष्ट आहेत ते जाणून घेऊया.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शाहरुख खान, जॉन अब्राहम (John Abraham) आणि दीपिका पदुकोण (Deepika Padukone)  यांच्या 'पठाण' चित्रपटाने प्रदर्शनाच्या 12 दिवसांत बॉक्स ऑफिसवर 400 कोटींचा आकडा पार करत एक इतिहास रचला आहे. या तीन सुपरस्टार कलाकारांच्या करिअरमध्ये 'पठाण' हा असा एकमेव चित्रपट आहे ज्यानं सर्वाधिक कमाई केली आहे. इन्स्टंट बॉलिवूडच्या आकडेवारीनुसार, शनिवारपर्यंत 'पठाण'चे बॉक्स ऑफिस कलेक्शन 401.40 कोटी होते. आता हे कलेक्शन 415 कोटींच्या जवळ पोहोचले आहे.


कोणत्या चित्रपटांना पठाणनं टाकलं कमाईच्या बाबतीत मागे?


दंगल (Dangal)
अभिनेता आमिर खानचा 'दंगल' हा चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रेक्षणीय चित्रपटांपैकी एक आहे. 'पठाण' आधी 'दंगल' बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटाच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर होता. आमिरच्या दंगलने बॉक्स ऑफिसवर 387.38 कोटींची कमाई केल्याची माहिती आहे.


संजू (Sanju)
संजय दत्तचा बायोपिक 'संजू'चे बॉक्स ऑफिसवर 342.86 कोटींची कमाई केली आहे.


पीके (Pk)
आमिर खानच्या पीकेनं 340.80 कोटींची कमाई केली होती. 


टाइगर जिंदा है (Tiger Zinda Hai)


टायगर जिंदा है या सलमानच्या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 339.16 कोटींची कमाई केली होती.


प्रदर्शनानंतर या चित्रपटानं पहिल्याच आठवड्याच कमाईचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेतच. जागतिक पातळीवर 700 कोटी रुपयांची कमाई करणारा हा पहिलाच हिंदी चित्रपट ठरला आहे. दर दिवशी या चित्रपटाच्या कमाईत मोठी भर पडत असून, अनेक विक्रमही तो मोडीत काढताना दिसत आहे. बरं याला होणारा विरोध आता मावळला असून, अनेकांनीच चित्रपटाला पसंतीही दिली आहे. तुम्ही 'पठान' पाहिलाय का?