Pathaan Box Office Collection Day 2: बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानने (Shahrukh Khan) बॉक्स ऑफिसवर (Box Office) जबरदस्त कमबॅक केलं आहे. तब्बल चार वर्षांनी पठाणच्या (Pathaan) निमित्ताने पुन्हा आपल्या चाहत्यांचं मनोरंजन करण्यासाठी मोठ्या पडद्यावर परतल्यानंतर शाहरुख खानने इतिहास रचला आहे. 'पठाण' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई (Pathaan Box Office Collection) केली आहे. यासह चित्रपट समीक्षकांचे अनेक दावे फोल ठरले आहेत. रिलीजनंतर दुसऱ्या दिवशीही चित्रपटाने मोठी कमाई केली असून 100 कोटींचा (100 cores) आकडा पार केला आहे. 


बॉक्स ऑफिसवर 'पठाण'ने रचला इतिहास


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच दिवशी 57 कोटींची कमाई करणाऱ्या पठाणचा बोलबाला दुसऱ्या दिवशीही कायम आहे. प्रजासत्ताक दिनाच्या सुट्टीचा पठाण चित्रपटाला चांगलाच  फायदा झाला आहे. चित्रपट समीक्षक रमेश बाला यांनी दिलेल्या माहितीनुसार, पठाणच्या हिंदी व्हर्जनने दुसऱ्या दिवशी तब्बल 70 कोटींची कमाई केली. दोन दिवसांत पठाणच्या कमाईचा आकडा 127 कोटी इतका झाला आहे. दुसऱ्या दिवसाच्या कमाईत पठाणे KGF2 लाही मात दिली आहे. KGF2 च्या हिंदी व्हर्जनने दुसऱ्या दिवशी 47 कोटींची कमाई केली होती. 


पठाण दुसऱ्या दिवशी 60 ते 65 कोटींचा व्यवसाय करेल असा अंदाज व्यक्त केला जात होता. पण पठाणने हे सर्व अंदाज खोटे ठरवत तब्बल 70 कोटींची कमाई केली आहे. यामुळे पठाण आगामी दिवसात इतिहास रचणार हे स्पष्ट आहे. रमेश बाला यांनी ट्वीट करत दिलेल्या माहितीनुसार, पठाणने बॉक्स ऑफिसवर 235 कोटींची कमाई केली आहे. 



पठाणने तोडले अनेक रेकॉर्ड


फक्त दोन दिवसांत पठाणने केलेला कमाईचा आकडा पाहता आगामी दिवसात अनेक रेकॉर्ड तुटणार हे स्पष्ट आहे. पठाणची जादू फक्त भारतच नव्हे तर देश-विदेशातही आहे. पठाण चित्रपट पाहण्यासाठी शाहरुखचे चाहते तुफान गर्दी करत आहेत. इतकंच नाही तर पाकिस्तानातही पठाण चित्रपट पाहण्यासाठी चाहते उत्सुक असून, तोंडभरून कौतुक करत आहेत. 



काश्मीरमध्ये गेल्या 32 वर्षांचा रेकॉर्ड तुटला आहे. खोऱ्यातही चित्रपटगृहांनाही याचा फायदा होत आहे.  32 वर्षांनी फक्त शाहरुख खानमुळे काश्मीरमधील चित्रपटगृहाबाहेर हाऊसफूलचा बोर्ड लागला आहे.