Besharam Rang Song Steal From Sajjad Ali : बॉलिवूडचा किंग खान अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan) हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. सध्या शाहरुख हा 'पठाण' (Pathaan)  चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. दरम्यान, चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असलेला शाहरुख हा चित्रपटातील 'बेशरम रंग' (Besharam Rang) गाण्यात दीपिका पदुकोणनं (Deepika Padukone) परिधान केलेल्या भगव्या बिकिनीमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. अनेक धार्मिक संघटनांचे लोक यावर आक्षेप घेत गाण्यातील काही सीन हटवण्याची मागणी करत आहेत. या वादानंतर  पठाण मधील 'बेशरम रंग' गाण्याबाबत सेंसर बोर्डनं चित्रपटातील गाण्यात काही बदल करण्यास सांगितले आहे.  त्यानंतर आता पाकिस्तानी गायक सज्जाद अलीनं (Pakistani Singer Sajjad Ali) या गाण्यावरून बॉलिवूडवर निशाणा साधला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सज्जाद अली यांनी 'बेशरम रंग' गाण्याविषयी मोठा खुलासा केला आहे. 'बेशरम रंग' हे गाणं त्याच्या 'अब के हम बिछडे' या बरीच वर्षे जुन्या असलेल्या गाण्यासारखे आहे. त्यांनी 'पठाण' चित्रपटाचे किंवा त्याच्या निर्मात्यांचे किंवा मग गाण्याचे नाव न घेता चोरीचा आरोप केला आहे. सज्जाद अली यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ते एका आगामी चित्रपटातील गाणं ऐकत असल्याचे सांगत आहेत. हे ऐकताना त्यांना 25-26 वर्षांपूर्वीच एक गाणं त्यांना आठवल्याचे सांगितले आहे.  


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


सज्जाद ‘पठाण’च्या ‘बेशरम रंग’ या गाण्याबद्दल बोलत असल्याचा अंदाज त्यांचे चाहते आणि नेटकरी लावत आहेत. सज्जाद अली यांच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी अनेक कमेंट केल्या आहेत. एका नेटकऱ्यांनं म्हटले की, ‘हे पठाणच्या बेशरम रंग गाण्यासारखं वाटतं.’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘बेशरम रंग हे गाणं सज्जाद अलीच्या 'अब के हम बिछडे' या गाण्याच्या मेलोडीसारखं आहे. भारतातील लोक नेहमीच पाकिस्तानी गायकांचे संगीत चोरतात आणि त्यांना श्रेयही देत ​​नाहीत. त्याच वेळी, काही नेटकऱ्यांच्या मते दोन्ही गाणी वेगळी आहेत. तर, काहींच्या मते दोन्ही गाण्यांची चाल सारखीच आहे. असे काही नेटकऱ्यांचे म्हणणे आहे. 


हेही वाचा : Alia Bhatt : 'यामुळे माझ्या कामावर परिणाम...', लग्न आणि मुलीच्या जन्मानंतर अखेर 'ती' जरा जास्तच स्पष्ट बोलली


दरम्यान, आजतकनं दिलेल्या वृत्तानुसार, बॉलिवूड इंडस्ट्रीवर पाकिस्तानी इंडस्ट्रीतून गाणी किंवा ट्यून चोरल्याच्या आरोपाची ही पहिलीच वेळ नाही. पाकिस्तानी कलाकारांनी यापूर्वीही अनेकदा असे दावे केले आहेत. गायक आणि राजकारणी अबरार-उल-हक यांनी घोषणा केली होती की करण जोहरच्या 'जुग्जुग जिओ' या चित्रपटातील त्यांचे आयकॉनिक गाणे 'नच पंजाबन' चोरल्याबद्दल ते टी-सीरिजवर खटला दाखल करणार आहे. अबरार यांनी सांगितले की, या गाण्याचे क्रेडिट मला दिलेले नाही. 


शाहरुखचा 'पठान' हा चित्रपट 25 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात शाहरुखसोबत दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद यांनी केले आहे तर यश राज फिल्मसनं चित्रपटाची निर्मिती केली आहे.