Jacqueline Fernandez : अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या अडचणीत वाढ, कोर्टाचं समन्स
अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या (Actor Jacqueline Fernandez) अडचणीत वाढ झाली आहे.
मुंबई : अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या (Actor Jacqueline Fernandez) अडचणीत वाढ झाली आहे. जॅकलिनला न्यायालयाने 200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात समन्स बजावलं आहे. जॅकलिनला दिल्लीच्या पतियाळा हाऊस कोर्टाचं समन्स बजावलंय. त्यानुसार अभिनेत्रीला 26 सप्टेंबरला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. (patiala house court summons actor jacqueline fernandez directing her to appear in court on 26 september connection with 200cr ruppes extortion case involving Sukesh chandrashekhar)
ईडीने (Enforcement Directorate) जॅकलिनवर आरोपपत्र दाखल केलं होतं. सुकेशने चंद्रशेखरने (Sukesh Chandrashekhar) 10 कोटीचे गिफ्ट्स दिले होते. हा पैसा 200 कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणातील असल्याचं ईडीने दाखल केलल्या आरोपपत्रात म्हटलंय. जॅकलिनला याची सर्व माहिती होती. यानंतरही जॅकलिनने गिफ्ट घेतले. त्यामुळे तिला आरोपी करुन घेण्यात आलंय.