मुंबई : Rajkummar Rao and Patralekhaa Wedding: राजकुमार रावने प्रेयसी पत्रलेखासोबतच्या त्याच्या 11 वर्षांच्या प्रेमसंबंधाला लग्नाचे नाव दिले आहे. दिग्दर्शक हंसल मेहता यांच्या ‘सिटीलाइट्स’ या चित्रपटातून एकमेकांच्या जवळ आलेले राज आणि पत्रलेखा यांची प्रेमकहाणी त्यांच्या चाहत्यांसाठी एखाद्या परीकथेपेक्षा कमी नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजकुमारच्या संघर्षाचे दिवस असोत किंवा पत्रलेखाला सोशल मीडियावर ट्रोलिंगला बळी पडावे लागले असेल… अशी वेळ कधी आली नाही की या जोडीने एकमेकांना साथ दिली नाही. सोमवारी चंदीगडमधील एका आलिशान रिसॉर्टमध्ये दोघांनी लग्न केले. 


राजकुमार आणि पत्रलेखा यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आले. यावेळी नववधू बनलेली पत्रलेखा लाल जोड्यात अतिशय सुंदर दिसत होती. केवळ सौंदर्यच नाही तर पत्रलेखाने लग्नात घातलेला दुपट्टाही तिच्या प्रेमाचा संदेश देताना दिसत होता.


पत्रलेखाचे पूर्ण नाव पत्रलेखा पॉल असून ती बंगाली आहे. पत्रलेखाने आपल्या खास दिवसाच्यावेळी दुपट्ट्यावर प्रेमाचा संदेशही बंगालीमध्ये लिहिलेला दिसत होता. लग्नानंतर लगेचच दोघांनीही आपापल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर लग्नाचे फोटो शेअर केले.



या फोटोंमध्ये राजकुमार आणि त्याची पत्नी पत्रलेखा खूपच सुंदर दिसत आहेत. दोघेही फॅशन डिझायनर सब्यसाचीने डिझाइन केलेल्या कपड्यात दिसले. पत्रलेखाने सुंदर लाल साडी नेसली होती आणि सोबत लाल दुपट्टा ओढला होता. या ओढणीवर प्रेम व्यक्त करणारा संदेश दिसत होता.


या ओढणीवर बंगाली भाषेत खऱ्या प्रेमाचा मंत्र लिहिला होता. याचा हिंदीत अर्थ आहे. ‘मी माझे हृदय तुला पूर्ण प्रेमाने समर्पित करते’लग्नाच्या या ओढणीवर प्रेम संदेश लिहिण्याचा हा एक चांगला पर्याय पत्रलेखाने निवडला आहे. 


पत्रलेखाच्या आधी, अभिनेत्री दीपिका पदुकोण देखील तिच्या लग्नात दुपट्टा परिधान करताना दिसली होती, ज्यावर लिहिले होते, 'सदा सौभाग्यवती भव:' तिचा लेहेंगा देखील सब्यसाचीने डिझाइन केला होता.


लग्नानंतर दोन्ही स्टार्सनी त्यांचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. आपल्या लग्नाचे फोटो शेअर करत राजकुमारने लिहिले की, 'अखेर 11 वर्षांच्या प्रेम, रोमान्स, मैत्री आणि मस्तीनंतर, आज मी माझ्याजवळ असलेल्या सर्व गोष्टींशी लग्न केले आहे. 


माझी सोबती, माझी चांगली मैत्रिण, माझं कुटुंब. आज पत्रलेखाचा पती म्हणून ओळख मिळवल्याचा वेगळा आनंद आहे.