मुंबई : कॉफी आणि बरंच काही, मिसेस अँड मि. सदाचारी या सिनेमाद्वारे प्रसिद्धी मिळवलेली अभिनेत्री प्रार्थना बेहरेचे नुकतेच डेस्टिनेशन वेडिंग पार पडले. 


गोव्यात पार पडला सोहळा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गोव्यात अनेक कलाकारांच्या उपस्थितीत १४ नोव्हेंबरला प्रार्थना दिग्दर्शनक अभिषेक जावकरशी विवाहबद्ध झाली. लग्नानंतर प्रार्थना आणि अभिषेक या दोघांनी मिळून एकमेकांना रोमँटिक गिफ्ट दिलेय.


पाहा काय दिलेय हे गिफ्ट


सोशल मीडियाद्वारे प्रार्थनाने या गिफ्टबद्दल सांगितलेय. तसेच "Breathing DREAMS like Air ..... ..... ." असं तिने कॅप्शनमध्ये म्हटलंय.या दोघांनी रिंग घातलेल्या बोटावर एकसाऱखा टॅटू काढलाय. टॅटूचा हा फोटो प्रार्थनाने शेअर केलाय.


प्रार्थना आणि अभिषेकच्या विवाहसोहळ्याला मराठी सिनेसृष्टीतील बरेच कलाकार उपस्थित होते. ऑगस्टमध्ये या दोघांचा साखरपुडा झाला होता. 



 


प्रार्थनाने झी टीव्हीवरील पवित्र रिश्ता या मालिकेत वैशालीची भूमिका साकारली होती. त्यानंतर तिने मराठीत जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा, कॉफी आणि बरंच काही, मि. अँड मिसेस सदाचारी, मितवा, फुगे, वक्रतुंड महाकाय या सिनेमांत काम केलेय.