मुंबई : इंडियन आयडल विजेता पवनदीप राजन आजकाल त्याच्या लव्ह लाईफबद्दल अधिक प्रसिद्ध होत आहे. नुकतंच त्याने एक फोटोशूट केल आहे. हे फोटोशूट खूप व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो अरुणिता कांजीलालसोबत रोमँटिक अंदाजात दिसत आहे. त्याची हा रोमँटिक अंदाज चांगलाच व्हायरल होत आहे.


रोमँटिक अंदाजात अरूणिता पवनदीप 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या सोशल मीडियावर पवनदीप राजन आणि अरुणिता कांजीलाल यांच्या जोडीची बरीच चर्चा आहे. दोघांचे रोमँटिक फोटो आणि डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. इंडियन आयडॉल 12 सिझननंतर दोघेही अनेकदा एकत्र दिसत आहेत. यासोबतच त्यांची लव्हस्टोरी देखील सोशल मीडियावर बरीच चर्चेत राहिली आहे. दरम्यान, त्यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यात ते रोमँटिक मूडमध्ये दिसत आहेत.


अरूणीताच्या चाहत्यांनी शेअर केला फोटो 



हे फोटो अरुणिता कांजीलाल यांच्या फॅनपेज इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आले आहेत. ज्यात दोघेही अगदी क्लोज आणि रोमँटिक स्टाईलमध्ये दिसत आहेत. चाहत्यांना अरुणिता आणि पवनदीपची जोडी आवडते.  त्यांच्या या फोटोवर चांगलीच चर्चा रंगली आहे. य़ा फोटोवर चाहत्याने 'कुणाची नजर न लागो' असं लिहिले आहे. तर दुसऱ्याने 'रब ने बना दी जोडी' लिहिले आहे, तर कोणी लिहिले आहे, ''Cuttest couple I have ever seen pawandeep and arunita'


पवनदीप Indian Idol 12 चा विजेता 


पवनदीप राजनने इंडियन आयडॉल 12 चे विजेतेपद पटकावले. तर अरुणिता कांजीलाल सेकंड रनर अप ठरली. शो दरम्यान, चाहत्यांनी त्या दोघांवर त्यांच्या प्रेमाचा वर्षाव केला होता. शो कदाचित संपला असेल, पण दोघांची लोकप्रियता अबाधित आहे. शो दरम्यान, दोघांच्या गाण्याव्यतिरिक्त, रोमँटिक अँगल देखील दिसला. कधी त्या दोघांचे डान्स व्हिडिओ तर कधी सराव व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले.