भारती सिंगला ड्रग्ज पुरवणारा पेडलर अटक
पेडलरने वाचण्यासाठी केले अनेक प्रयत्न
मुंबई : कॉमेडीयन भारती सिंग (Bharti Singh) आणि तिचा पती हर्ष लिम्बाचिया (Haarsh Limbachiyaa) यांना रविवारी न्यायालयानं 4 डिसेंबरपर्यंतची कोठडी सुनावली. ज्यानंतर या दोघांच्याही अडचणीत वाढ झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. मात्र एनसीबीकडून करण्यात आलेल्या कारवाईनंतर अटकेत असणाऱ्या हर्ष आणि भारतीला मोठा दिलासा देत न्यायदंडाधिकारी कोर्टानं त्यांचा जामीन मंजूर केला. परंतू याप्रकरणी अद्यापही कारवाई सुरू आहे.
बुधवारी रात्री एनसीबीने कारवाई करत ड्रग्स पुरवणाऱ्या पेडलरला अटक केली आहे. ज्याने भारती आणि अन्य लोकांना ड्रग्सचा पुरवठा केला. मिळालेल्या माहितीनुसार वांद्रे कोर्ट जंक्शनमधून मध्यरात्री सुनील गवाई नावाच्या ड्रग्स सप्लायरला ताब्यात घेण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे सुनीलकडून १.२५० किलो ड्रग्स जप्त करण्यात आले आहे.
सुनील हा फूड डिलिव्हरी बॉयच्या वेशात भारती आणि अन्य लोकांना ड्रग्स पुरवण्याचं काम करत होता. पश्चिम मुंबई भागात तो मोठ्या प्रमाणात ड्रग्स सप्लाय करत असल्याचं एनसीबीच्या पडताळणीत समोर आलं आहे.
दरम्यान, ड्रग्ज पेडलर्सकडून मिळालेल्या माहितीनंतर कॉमेडियनच्या भारती सिंगच्या घरी एनसीबीने धाड टाकली होती. एनसीबीनं केलेल्या या कारवाईत त्यांचा घरात आणि कार्यालयात ८६.५ ग्रॉम ड्रग्स जप्त करण्यात आले. शिवाय गांजाचे सेवन करत असल्याची कबुली दोघांनी दिली होती.