मुंबई : 'जो जिता वही सिकंदर' या चित्रपटाच्या निमित्तानं प्रेक्षकांच्य़ा भेटीला आलेला प्रत्येक चेहरा सर्वंचीच मनं जिंकून गेला. अगदी खलनायकी भूमिकाही याला अपवाद ठरली नाही. अशा या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या अभिनेत्री आएशा झुल्का हिलाची चांगलीच लोकप्रियता मिळाली. तिच्या कारकिर्दीला चांगली चालनाही मिळाली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

90 च्या दशकात 'खिलाड़ी', 'जो जीता वही सिकंदर', 'बलमा', 'रंग' आणि 'वक्त हमारा है' अशा चित्रपटांतून ती झळकली. पण, ऐन प्रसिद्धीच्याच काळात तिनं या झगमगणाऱ्या बॉलिवूडपासुन दुरावा पत्करला आणि व्यवसाय क्षेत्रात उडी मारली. आएशा तिच्या तथाकथित प्रेमप्रकरणांमुळेही प्रकाशझोतात आली होती. 


कारकिर्दीत एका उंचीवर असतानाच आएशा ज्या व्यक्तीच्या प्रेमात होती, त्या व्यक्तीसोबतची तिची समीकरणं बदलली असं म्हटलं जातं. परिणामी या साऱ्यातून सावरण्यासाठी तिनं वेळ घेतला. पण, यानंत जेव्हा ती चित्रपट वर्तुळात परतली होती तेव्हा बऱ्याच गोष्टी बदलल्या होत्या. नव्या अभिनेत्रींना रुपेरी पडद्यावर जागा मिळाली होती. आजच्या घडीला आएशाचं या बॉलिवूड विश्वाशी थेट नातं नाही. तिचा लूकही बऱ्याच अंशी बदलला आहे. 


Assam-Mizoram Clash : 'कोणाकोणाचे आभार मानू?', IPS वैभव निंबाळकर यांच्या पत्नीला भावना अनावर 


 


2003 मध्ये आएशानं बांधकाम व्यावसायिक समीर वाशी याच्याशी लग्नगाठ बांधली. 'अमर उजाला'च्या वृत्तानुसार एका मुलाखतीत आएशानं आपण सॅमरॉक या कंपनीच्या कामात व्यग्र असल्याचं सांगितलं होतं. ही कंपनी आएशानं तिच्या पतीसोबत सुरु केली होती. हिंदी चित्रपट वर्तुळातून बाहेर पडण्याबाबतच्या प्रश्नाचं उत्तर देत तिनं एका मुलाखतीत अनेकांचं मन जिंकणारा विचार मांडला होता. कारकिर्द संपवण्यासाठी चित्रपट फ्लॉप होण्याची वाट पाहण्यापेक्षा योग्य वेळी पुढे निघून जाणं कधीही उत्तम, हाच विचार तिनं एकदा एका मुलाखतीत मांडला होता.