Deepika and Ranveer Singh : मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत हा 12 जुलै रोजी राधिका मर्चेंटसोबत लग्न बंधनात अडकला. जियो सेंटरमध्ये त्या दोघांनी सप्तपदी घेतल्या. त्यानंतर सगळेच त्या दोघांना शुभेच्छा देताना दिसत आहेत. या दरम्यान, क्रिकेटपटू महेंद्र सिंग धोनीनं देखील या जोडप्यासाठी एक पोस्ट शेअर केली आहे. महेंद्र सिंग धोनीच्या पोस्टनं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. खरंतर माहीनं काय पोस्ट केलं त्याची चर्चा नाही तर त्या फोटोच्या बॅक ग्राऊंडला असलेल्या रणवीर आणि दीपिकानं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धोनीने हा फोटो त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या पोस्टमध्ये लग्नाच्या जोड्यात असलेली राधिका त्याला मिठी मारताना दिसते. तर दुसरीकडे त्यांच्याच जवळ उभे असलेले अनंत आणि साक्षी त्यांच्याकडे पाहत आहेत. ही पोस्ट शेअर करत महेंद्र सिंग धोनीनं कॅप्शन दिलं की 'राधिका, तुझ्या चेहऱ्यावर असणारं हे हसू कधीच कमी होऊ देऊ नको. अनंत एक विनंती आहे की ज्या प्रकारे तू तुझ्या आजुबाजूला असलेल्या लोकांची काळजी घेतोस, त्यांच्यावर प्रेम करतोस ते सगळं राधिकासाठी करशील. तुमच्या वैवाहिक आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा, आनंद आणि एडव्हेंचर असो. खूप खूप शुभेच्छा आणि लवकरच तुमच्यासगळ्यांशी भेट होईल. गाणं वीरेन काकांसाठी आहे.' तर या सगळ्यात त्या चौघांच्या मागे रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण दिसत आहेत. त्या दोघांच्या पोस्टनं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. 



हेही वाचा : इटलीत सामान- पैसा, पासपोर्ट... सर्वकाही चोरीला गेलेली सेलिब्रिटी जोडी अखेर मायदेशी परतणार; त्यांचं तारणहार कोण?


सोशल मीडियावर धोनी आणि राधिका पेक्षा जास्त चर्चा ही दीपिका आणि रणवीर यांची होतेय. एकानं कमेंट केली की 'दीपिका बोलत असेल की दुसऱ्याच्या पत्नीकडे बघू नकोस.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'ते सगळं ठीक आहे, पण मागे दीपिका रणवीरशी बोलते की घरी चल तू, खूप नाचलास.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'मागे बघा. रणवीरला डान्स करायचा आहे आणि दीपिकाला घरी जायचंय.' आणखी एक नेटकरी म्हणाला की 'बॅकग्राऊंडला दीपिका किती चिडलीये ते दिसतंय.' दुसरा नेटकरी म्हणाला की 'मागे दीपिका आणि रणवीर का भांडतायत.'