इटलीत सामान- पैसा, पासपोर्ट... सर्वकाही चोरीला गेलेली सेलिब्रिटी जोडी अखेर मायदेशी परतणार; त्यांचं तारणहार कोण?

Divyanka Tripathi and Vivek Dahiya : अखेर दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दहिया यांची 'घर वापसी'

दिक्षा पाटील | Updated: Jul 15, 2024, 08:43 AM IST
इटलीत सामान- पैसा, पासपोर्ट... सर्वकाही चोरीला गेलेली सेलिब्रिटी जोडी अखेर मायदेशी परतणार; त्यांचं तारणहार कोण? title=
(Photo Credit : Social Media)

Divyanka Tripathi and Vivek Dahiya : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कपल्सपैकी एक असलेले दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दहिया या दोघांनाही फिरायला खूप आवडतं. ते नेहमीच कुठे ना कुठे फिरताना दिसतात. खरंतर, नुकतेच ते दोघं यूरोपला ट्रिपला गेले होते. तेव्हा त्यांच्यासोबत अनपेक्षित झालं. त्यांचे पासपोर्ट आणि सामानासोबत बाकी सगळ्या गोष्टी इटलीच्या फ्लोरेंसमध्ये चोरी झाल्या. त्यानंतर त्या दोघांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मदत मागितली. 

दरम्यान, काल 14 जुलै रोजी दिव्यांका त्रिपाठी विवेकनं त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली. ही पोस्ट शेअर करत त्यांनी सांगितलं की सगळ्या प्रकरणानंतर ते आता भारतात परत येत आहेत. त्यांनी त्यांना मिळालेल्या प्रेम आणि सपोर्टसाठी सगळ्यांचे आभार मानले आणि त्यांना मिळालेल्या मदतीविषयी सांगितलं. भारतीय एम्बसीमुळे ते भारतात परत येत असल्याचे त्यांनी सांगितलं. त्यावेळी त्यांनी या पोस्टमध्ये त्यांचा पासपोर्ट दाखवला आणि कॅप्शन लिहिलं की 'लवकरच भारतात येतोय. तुम्ही दिलेल्या प्रेम आणि समर्थनासाठी तुमच्या सगळ्यांचे आभार. आमची 'घर वापसी' होऊ शकते यासाठी भारतीय एम्बसीचे आभार.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

हेही वाचा : लग्नाआधीच झाली 34 मुलींची आई, परदेशातील व्यावसायिकाशी लग्न केल्यानंतर सोडलं बॉलिवूड; आता करतीये कमबॅक

10 जुलै रोजी फ्लोरेंसमध्ये दिव्यांका आणि विवेक यांच्या सामानाची चोरी झाली आणि त्यासोबत त्यांचे पासपोर्ट, पाकिटं, पैसे आणि शॉपिंग केलेला सगळा सामान हा त्यांच्याकडून हिसकावून चोरी करण्यात आला. 'ईटाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीत विवेकनं हे संपूर्ण प्रकरण सांगितलं. त्यानं सांगितलं की 'ते तिथे एक प्रॉपर्टी पाहण्यासाठी जात होते तेव्हा चोर त्यांच्या समोर आले आणि सगळा सामान हिसकावून निघून गेले. त्या घटनेलासोडून आमची ही संपूर्ण ट्रिप चांगली होती. आम्ही काल फ्लोरेंस पोहोचलो आणि एक दिवस तिथे थांबण्याचं आम्ही ठरवलं होतं. आम्ही राहण्यासाठी जी प्रॉपर्टी निवडली होती ती पाहण्यासाठी आम्ही गेलो. तिथे जाताना आम्ही आमचा सगळा सामान हा बाहेर असलेल्या आमच्या गाडीत ठेवला. त्यानंतर जेव्हा आम्ही आमचा सामान घेण्यासाठी परत आलो, तेव्हा हे पाहून आम्हाला धक्का बसला की आमची गाडी ही तुटली होती आणि आमचे पासपोर्ट, पाकिटं, पैसे आणि खरेदी केलाला  आणि सगळा सामाना हा चोरी झाला होता. मात्र, नशिबानं चोरांचा आमचे काही जुने कपडे आणि जेवण तिथेच राहू दिलं होतं.'