मुंबई : सलमान खान आमि जॅकलिन यांच्या आगामी रेस ३ सिनेमाची सध्या सगळीकडे चर्चा आहे. सिनेमाची शूटींग जॅकलिनसाठी अजिबात सोपी नव्हती. जॅकलिनने इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपल्या हेल्थशी संबंधित पोस्ट शेअर केली आहे. 'ही एक कायमस्वरूपी दुखापत आहे. माझ्या डोळ्याचा आयरिस कधी पूर्ण गोल होणार नाही. तरीही मी आज जग बघु शकते ही फार मोठी गोष्ट आहे.' असे तिने लिहिले आहे. याआधी जॅकलिनचा व्हिडिओ समोर आला होता. त्यामध्ये ती 'हिरिए' ची शूटींग करताना वाईट पद्धतीने जखमी झाली होती. सिनेमातील 'हिरिए' गाणंदेखील प्रेक्षकांच्या चांगलच पसंतीस पडलं. यामध्ये ती सलमानसोबत पोल डान्स करताना दिसली. रेमो डिसूजा दिग्दर्शित रेस ३ हा सिनेमा १५ जूनला प्रदर्शित होणार आहे. रेस सीरीजच्या पहिल्या दोन सिनेमात सैफ अली खान प्रमुख भूमिकेत होता. पण रेस ३ मध्ये सलमान खान झळकणार आहे. चाहत्यांबरोबरच सलमानही या सिनेमासाठी अत्यंत उत्सुक आहे.



'अल्‍लाह दुहाई है' 


ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणाऱ्या या सिनेमाचे नवे गाणे 'अल्‍लाह दुहाई है' प्रेक्षकांच्या चांगलेच पसंतीस उतरले आहे. हे गाणे रेस सीरीजच्या आतापर्यंत दोन सिनेमांचाही भाग होते. आता या सीरीजच्या तिसऱ्या सिनेमातही सर्व स्टार्स 'अल्‍लाह दुहाई है' करताना दिसणार आहेत.  गाण्यात सलमान खानसोबत सिनेमातील इतर कलाकारही दिसत आहेत. यावेळेस अल्लाह दुहाई है हे गाणे गायक अमित मिश्रा, जोनिता गांधी आणि श्रीरामा चंद्रने गायले आहे. तर राजा कुमारी यांनी गाण्याला रॅप दिला आहे.