मुंबई : कुंडलीमधील ग्रह-नक्षत्र, जन्म तारीख, शरीर, पर्सनॅलिटी इत्यादी गोष्टी व्यक्तीच्या भविष्याचा अंदाज बांधू शकतात. एवढंत नाही तर व्यक्तीच्या उठण्या-बसण्याची स्टाईल त्याच्याबद्दल अनेक गोष्टी सांगतात. आज आपण खुर्चीवर वेग-वेगळ्या स्टाईलने बसणाऱ्या व्यक्तींच्या अंदाजाबाबत जाणून घेणार आहोत. यावरून कळेल तुमचा स्वभाव चांगला आहे, की वाईट...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खुर्चीत बसण्याचा प्रत्येकाचा वेगळा अंदाज...
- ज्या व्यक्ती खुर्चीत बसताना गुडघे जवळ ठेवतात आणि गुडघ्या खालचे पाय दूर ठेवतात. अशा लोकांना जबाबदाची जाणीव कमी असते. कठीण प्रसंगी येताचं अशा व्यक्ती मागे हटतात.  


- ज्या व्यक्ती क्रॉस बसतात. त्या प्रचंड क्रिएटिव्ह, विनम्र आणि लाजाळू असतात. अशा व्यक्ती जीवनाचा आनंद घेतात. अशा व्यक्ती फक्त स्वतःच्या मनाचं ऐकतात. खुर्चीत क्रॉस बसणाऱ्या व्यक्तींना जे काम आवडत नाही, असे काम ते करत नाहीत. 


- जे खुर्चीवर बसताना पाय सरळ ठेवतात आणि गुडघ्यापासून खालपर्यंत बंद करतात, ते शिस्तबद्ध जीवन जगतात. ते नेहमी स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करत असतात. 


- जे लोक दोन्ही पाय चिकटून व तिरके बसतात, हे लोक हट्टी पण मस्त असतात. ते खूप महत्त्वाकांक्षी असतात. महत्त्वाचं म्हणजे ते स्वतः घेतलेल्या निर्णयावर ठाम आहेत.


(वरील माहिती सर्वसामान्य समजुतींवर आधारित आहे, झी 24 तास याची खातरजमा करत नाही)