नवी दिल्ली : गेल्या अनेक दिवसांपासून बॉलिवू़ड अभिनेत्री सनी लिओनी छोट्या पडद्यावरील कार्यक्रमांमध्ये व्यस्त आहे. काही दिवसांपूर्वी सनीने 'अर्जुन पटियाला' या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं. मात्र 'अर्जुन पटियाला' या चित्रपटातील सनीने केलेली एक छोटीशी चूक एका दुसऱ्याच माणसाला त्रासदायक ठरत असल्याचं समोर आलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सनी 'अर्जुन पटियाला' चित्रपटात डायलॉग बोलताना एक मोबाईल नंबरही सांगते. पण, चित्रपटाच्या संपूर्ण टीमला याची जराही कल्पना नव्हती की, अशाप्रकारे एखादा संपूर्ण फोन नंबर सांगणं किती त्रासदायक ठरु शकतं. 


मात्र, चित्रपटात सनीने जो नंबर सांगितला आहे, तो दिल्लीतील एका व्यक्तीचा असल्याचं समोर आलं आहे. हा व्यक्ती दिल्लीतील मौर्या एनक्लेव या भागात राहतो. तो एका खासगी कंपनीत सीनियर एग्झिक्यूटिव्ह या पदावर कार्यरत आहे. पुनीत अग्रवाल असं त्या व्यक्तीचं नाव आहे. 


सनीचा 'अर्जुन पटियाला' हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर, सनीने चित्रपटात सांगितलेल्या नंबरवर पुनीत अग्रवाल या व्यक्तीला अश्लील मेसेज, कॉल येण्यास सुरुवात झाली. पुनीतने याविषयी विचारणा केली असता, चित्रपटात सनीने हा नंबर सांगितला असल्याचं एकच उत्तर मिळत होतं. कॉल करणारा प्रत्येक जण सनीला भेटण्याविषयी बोलत होता. मात्र पुनीत प्रत्येकाला हा नंबर तिचा नसल्याचं सांगत होता. 


अश्लील कॉल आणि मेसेजने कंटाळून रविवारी रात्री पुनितने मौर्या एनक्लेव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. 'सनीने चित्रपटात सांगितलेला नंबर माझा असून अशाप्रकारे चित्रपटात कोणाच्याही परवनागीशिवाय फोन नंबरचा वापर केला जाऊ शकत नसल्याचं' पुनीत यांनी म्हटलं आहे.


'अर्जुन पटियाला' प्रदर्शित झाल्यापासून पुनीत अग्रवाल यांना तीनशेहून अधिक कॉल आले असल्याचं त्यांनी सांगितलंय.